MB NEWS:सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

 सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी

 


समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर

 

परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

 

परळी । प्रतिनिधी

समाजाच्या जडण-घडणीमध्ये पत्रकारीतेचा वाटा खूप मोठा आणि मोलाचा आहे. मागील काळात पत्रकारीतेवर अनेक संकटं आली परंतू त्यावरही मात करीत करीत पत्रकारांनी आपली समृध्द वाटचाल सुरूच ठेवली आहे. अलिकडच्या काळात वृत्तपत्र माध्यमांना सोशल मीडियाशी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. परंतू बदलच्या काळाबरोबर पत्रकारांनी बदलून घेवून सोशल मीडियाला आपला मित्र बनवले पाहीजे असे मत लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मराठवाडा साथी पीसीएन न्युजच्या कार्यालयात परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

परळी शहर आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पन दिन कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी, दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर, नगरसेवक गोपाळ आंधळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर परळी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा सत्कार आणि त्यांना मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. विरशैव सभेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले की, समाजाच्या भल्यासाठी भावनात्मक पत्रकारीता पत्रकारांनी केली पाहीजे. जे जे समाजाच्या हिताचे असेल त्याला प्रसिध्दी देवून न्याय देण्याचे काम आपल्या लेखनातून झाले पाहीजे एवढीच अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले. नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आजच्या पत्रकारांनी आत्मचिंतन करावे असे सांगितले तर पत्रकारीतेत येणाऱ्या प्रत्येकाने अगोदर आत्मनिर्भर झाले तरच समाजहिताची पत्रकारीता आपल्याला करता येऊ शकते असे मत दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय काळे यांनी केले. या कार्यक्रमास परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे, तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, कार्याध्यक्ष धिरज जंगले, संपादक सतिश बियाणी, राजेश साबणे, शिवशंकर झाडे, आत्मलिंग शेटे, जी.एस.सौंदळे, अनंत भातांगळे, विश्वास महाराज पांडे, जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, राजेश कोकलगावे, मोहन व्हावळे, प्रा.प्रविण फुटके, धनंजय आरबुने, जगदीश शिंदे, स्वानंद पाटील, महादेव शिंदे, संतोष जुजगर, कैलास डुमणे, प्रा.दशरथ रोडे, सौ.सुकेशिनी नाईकवाडे, संजिब रॉय, गौतम साळवे, सचिन भांडे, अनिल गायकवाड, संदीप मस्के, वहाज सय्यद आदींची उपस्थिती होती. आजच्या दर्पण दिनाच्या कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छांची आदान-प्रदान केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार