पोस्ट्स

MB NEWS- *सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ*

इमेज
 *सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत फ्रंट लाईन फिल्डवर्कर असलेल्या पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ करण्यात आला.            राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेवाधर्म या उपक्रमात कोरोना फ्रंट लाईन लीडर यांना कोरोना सुरक्षा किटचे सुनियोजित पद्धतीने वितरण चालू असून आज पत्रकार बंधू भगिनींना सुरक्षा किट वितरणाची सुरुवात संपादक मंडळ यांच्यापासून करण्यात आली. यावेळी दै.मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी,दै.जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडभाने, दै.दिव्यअग्नी चे संपादक प्रकाश सुर्यकर, दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, दै.परळी प्रहारचे राजेश साबणे,दै. महाराष्ट्र प्रतिमा चे ज्ञानोबा सुरवसे, दै.न्याय टाइम्सच

MB NEWS-परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा

इमेज
  परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा  परळी वैजनाथ - सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील ब्राम्हण महिला मंच तर्फ साजरा करण्यात आला.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करून भगवान परशुरामांना यावेळी वंदन करण्यात आले.श्री विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. परशुराम स्त्रोत्राचे 11 वेळा पठण करून आरती व मंत्रपुष्पांजली करत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.पहले ब्राम्हण होने पर गर्व था, अब ब्राम्हण होने पे घमंड है.. पंडित की संतान है हम. इतना रुतबा रखते है . इतिहास क्या चीज है . हम तो भूगोल बदलने का दम रखते है जय परशुराम - जय श्री राम अशा घोषणा यावेळी देण्यात आला.यावेळी ब्राम्हण महिला मंच परळी अध्यक्षा वर्षा जोशी,किर्ती धोंड,सुमेधा जोशी,अर्चना दगडगुंडे,शोभा कुलकर्णी,विद्या खिस्ते आदि महिलांची उपस्थिती होती.

MB NEWS-धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय 'संजीवनी' !* ⬛ *महिला व लहान मुलांमुलीं करिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र बनले 'आधारगृह'*

इमेज
 * धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय 'संजीवनी' !*  ⬛ *महिला व लहान मुलांमुलीं करिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र बनले 'आधारगृह'*   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......         कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना अनेक व्यक्ती, संस्था पुढे येऊन  मदत करत आहेत.कोरोनाचा वाढता कहर पाहता  करोनाग्रस्त जनतेसाठी मदत म्हणून विविध क्षेत्रातील लोक काम करत आहेत. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी  'संजीवनी' ठरत आहे.धनुभाऊंचा सेवाधर्म उपक्रम या कठिण काळात खरोखरच लोकोपयोगी व लाभदायक ठरत आहे.महिला व लहान मुलांमुलींकरिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र खुप मोठे 'आधारगृह' ठरले आहे.          राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोविड काळातील मदतीचा सेवाधर्म...सारं काही समष्टिसाठि या लोकोपयोगी अभिनव उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संचलित शास

MB NEWS-बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला हात घालून केले विवस्त्र ! ⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛

इमेज
  बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला  हात घालून केले विवस्त्र ! ⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      संवेदनशील मनाला रुखरुख लागून जाईल अशा काही घटना अवतीभवती नेहमीच घडतात.साध्या सरळ व सामान्य दिसणार्या या घटना मात्र कधीकधी मनात रुतुन जातात.अशाच प्रकारची घटना परळीतील संवेदनशील मनाच्या एका छायाचित्रकाराला अनुभवायला मिळाली आहे. या घटनेने मनाच्या खोलवर ही वेदना भळभळत असुन जिवापाड जपलेल्या एका वृक्षाची बहरात असताना झालेली छाटणी या छायाचित्रकाराला बैचेन व हतबल करुन टाकत आहे. अंगभर साज,शृंगाराला हात घालून विवस्त्र करावे असेच या झाडाबाबत घडल्याची खंत व्यक्त होत आहे.       सध्याच्या वातावरणामध्ये आॅक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला लक्षात आले आहे.आॅक्सिजन मिळवण्यासाठी नाही नाही ते करावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन चळवळ उभी करून अधिकाधिक झाडांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.परळीतही २०११ मध्ये फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली.या अंतर्गत परळीतील सर्व परिचित छा

MB NEWS-सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट*

इमेज
  सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट* परळी (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात नागरिकांना एक आधार म्हणून सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत विविध कोविड मध्ये सेवा देत असलेल्या रिक्षा, रुग्णवाहिका, शववाहिका आदी वाहनांवरील चालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट वाटप करण्यात आले. न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आज परळीतील रुग्णवाहतुक, रुग्णसेवा तसेच नगर परिषदेस कोरोना रुग्णाची अंत्यविधि करण्यासाठी सहकार्य करणारे वाहन चालक यांना कोरोना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी नागनाथ भाग्यवंत, गणेश काळे, वैजनाथ कासार, शरीफ भाई, मुखतार सेठ, कोयला भाई, सिद्धेश्वर फड, महादेव भोसले, हनुमंत कराड, संतोष गायकवाड, योगेश पिसाळ, जावेद शेख, वैजनाथ खरोडे, नारायण गित्ते, राम पाळवदे यांच्यासह अनेक चालकांना कोरोना सुरक्षा किट देण्यात आले.    यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक तालुकाअध्यक्ष संतोष शिंदे, संजय गांधी

MB NEWS-पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे

इमेज
 पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   परळी शहरासह तालुक्यातील लसिकरण केंद्रावर लस उपलब्ध करुन देण्यात आली असुन येणार्या काळात सर्व नागरीकांचे लसिकरण पुर्ण होण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लसींचा साठा उपलब्ध करु असे पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले. शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रांना भेटी देवुन आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.    सध्या उपलब्ध असलेल्या लसींमधून ज्या नागरिकांना पहिला डोस देऊन विहित वेळ पूर्ण झाली आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक असल्याने परळी तालुक्यातील नटराज रंगमंदिर व प्रा आ केंद्र मोहा, प्रा आ केंद्र पोहनेर , प्रा आ केंद्र सिरसाळा प्रा आ केंद्र धर्मापुरी, प्रा आ केंद्र नागापूर येथील लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील दुसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला. शुक्रवारी दि.14 मे रोजी सभापती बालाजी मुंडे यांनी शहरातील एका व तालुक्य

MB NEWS- *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*

इमेज
 *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी* परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोना विषयक उत्साहात साजरी करण्यात आली.              गाढे पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, रामेश्वर घेवारे व बन्सी सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुलिंग महाराज फुटके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जिवन कार्याचा आढावा मांडताना सांगितले की, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातीय व्यवस्था निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न केले. तर माजी सरपंच कांतराव सोनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती सर्वांसमोर मांडताना सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज अल्पा

MB NEWS-गुरुनाथ लांडगे यांचे निधन

इमेज
  गुरुनाथ लांडगे यांचे निधन परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)        शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ रामलिंगआप्पा लांडगे (वय ८५) अल्प आजाराने शुक्रवारी (ता.१४) सकाळी निधन झाले.                शहरातील हैद्राबाद बँक परिसरातील    रहिवाशी, प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ रामलिंगआप्पा लांडगे यांचे अल्प आजाराने निधन झाले. शुक्रवारी येथील विरशैव स्मशानभूमीत ११ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुनाथ लांडगे धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच शनि मंदिरात साजऱ्या होणाऱ्या शनैश्वर जन्मोत्सवात हिरीरीने सहभागी होत असत त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

MB NEWS-परळी शहरात फिरत्या अन्नछत्रचा शुभारंभ राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम

इमेज
  परळी शहरात फिरत्या अन्नछत्रचा शुभारंभ राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम परळी । प्रतिनिधी लॉकडाऊनच्या कार्यकाळात हातावर पोट असलेले कामगार, घरामध्येच विलगीकरणात असलेले कोरोना रूग्न व त्यांचे नातेवाईक तसेच परळी शहरात असलेल्या भिक्षुकरूंसाठी गेल्या दीड वर्षापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठान संचलित स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या माध्यमातून मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर परळी शहरात याच उपक्रमाच्या माध्यमातून फिरत्या अन्नछत्र अभियानाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आला, यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राधा-मोहन साथी प्रतिष्ठान संचलित स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या फिरत्या अन्नछत्र अभियानाचा शुभारंभ शुक्रवार, दि.१४ रोजी करण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशीच अक्षय्य तृतीया असल्याने गरजूंसाठी जे जेवण पाठविण्यात आले होते त्यात आंबरस व पोळीचा स्वयंपाक होता. यावेळी बोलतांना जेष्ठ विधीज्ञ ॲड.जिवनराव देशमुख

*ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे* *विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली - ना. मुंडे*

इमेज
 *ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे* परळी (दि. 14) ---- : आपल्या विनोदी शैलीतील कीर्तनातून अध्यात्म आणि समाज प्रबोधन या संयुगाची ख्याती राज्यभरात पसरवलेले, बीड जिल्ह्याचे भूषण विनोदाचार्य ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. दादांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादांचे कुटुंबीय व शिष्य परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे; अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.  वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांची त्यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनातून राज्यभरात ख्याती होती. त्यांच्या कीर्तनाच्या सीडी-कॅसेट्स, व्हीडिओ आजही प्रसिद्ध आहेत, तसेच कीर्तन सेवेत प्रमाण म्हणून वापरले जाणाऱ्या विनोदाचे त्यांनी पुस्तकही लिहिले आहे.  वारकरी संप्रदायाचे पाईक ह.भ.प. इंगळे दादा यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक प्रबोधनाची चळवळ राबवली

MB NEWS-प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन

इमेज
  प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन बीड, प्रतिनिधी... महराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.मागील पन्नास वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला. विविध चैनल वर त्यांचे कीर्तने संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक ऐकत असत.

MB NEWS-सेवाधर्म उपक्रमांतर्गत आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द* *परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे मोफत वाटप*

इमेज
 * सेवाधर्म उपक्रमांतर्गत आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द* *परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे मोफत वाटप* परळी (दि. 13) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या "सेवाधर्म" या उपक्रमात आज परळी शहरातील रमेश विश्वनाथराव लोखंडे व प्रकाश हरिभाऊ व्हावळे या दोन कुटुंबांतील कन्येच्या विवाहाला प्रत्येकी 10000 रुपये विवाह सहाय्यता निधी देण्यात आला. ना. मुंडे साहेबांच्या आईंच्या हस्ते या दोन कुटुंबांना विवाह सहाय्यता निधी देण्यात आला.  यावेळी न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक केशव बळवंत, सभापती पाणी पुरवठा गोविंदराव मुंडे, सरचिटणीस अनंत इंगळे, दै. जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडभाने, दै. दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर, युवानेते शंकर कापसे, राष्ट्रवादी सेवा दल चे अध्यक्ष लालाखान पठाण, गिरीष भोसले, अमर रोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात सेवाधर्मच्या विविध उपक्रमामधून नागर

MB NEWS- *पंकजाताई मुंडेंनी कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञाचे पत्रकारांनी केले कौतुक !* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला दिली भेट ; रूग्णांचीही केली आस्थेवाईकपणे विचारपूस*

इमेज
 *पंकजाताई मुंडेंनी कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञाचे पत्रकारांनी केले कौतुक !* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला दिली भेट ; रूग्णांचीही केली आस्थेवाईकपणे विचारपूस*  परळी । दिनांक १३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कोरोना बाधित रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञ उपक्रमांचे शहरातील पत्रकारांनी कौतुक केले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला आज भेट देऊन पत्रकारांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच रूग्णांची देखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली.    पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी ३ मे पासून सेवा यज्ञ सुरू केला आहे. प्रतिष्ठानच्या शंभर बेडच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमध्ये निवास, भोजन, औषधोपचार, तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून वेळोवेळी तपासणी अशी रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोणत्याही रूग्णाला एक रूपया देखील खर्च करावा लागत नाही, सर्व व्यवस्था प्रतिष्ठान कडून मोफत केली जात आहे. आतापर्यंत या सेंटरमध्ये ९० रूग्ण दाखल झाले होते, त्यापैक

MB NEWS- *समाज बांधवांनी भगवान परशुराम जन्मोत्सव साध्या पद्धतीने कुटुंबासोबत घरीच साजरा करावा - दिनेश लोंढे*

इमेज
 *समाज बांधवांनी भगवान परशुराम जन्मोत्सव साध्या पद्धतीने कुटुंबासोबत घरीच साजरा करावा - दिनेश लोंढे* परळी वैजनाथ - देशात मागील एक वर्षापासून कोरोना या महामारीचे संकट असून, सर्व समाज बांधवांनी श्री विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मागील वर्षाप्रमाणे आपल्या घरीच आपल्या कुटुंबासोबत साजरा करावा व या कठीण काळात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री दिनेश लोंढे यांनी केले आहे.

MB NEWS-बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह

इमेज
  बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. बीड जिल्ह्याचा आजचा दि.१२ कोविड अहवालात १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह आले आहेत.          आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात १२७० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये परळी तालुक्याची संख्या ५८ आहे. कोरोना संसर्गाची साखळी मात्र संपुर्णतः तुटताना दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-खरीप हंगामात 1600 कोटी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन* *धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक *

इमेज
 *गावस्तरावरून पीककर्ज वाटपाचे नियोजन करा - धनंजय मुंडे* * खरीप हंगामात 1600 कोटी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन* *धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक * बीड (दि. 12) ----- : खरीप हंगाम 2021 साठी बीड जिल्ह्यात 1600 कोटी पीक *कर्जवाटपाचे* लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन कर्ज मागणारे शेतकरी यांना 100% कर्ज मिळायला हवे, त्यानुसार आवश्यकता भासल्यास लक्ष्य ठरवलेली रक्कम वाढविण्यात यावी. लॉकडाऊनमुळे कर्ज प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव यांच्या मार्फत कर्जाचे अर्ज देणे व अर्ज व आवश्यक कागदपत्रे संकलन करणे अशी गावस्तरावरून प्रक्रिया राबवावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका (व्हीसी द्वारे) आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय कृषी संचालक एल.डी. जाधव, जिल्ह

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व शांतीवनच्या आयसोलेशन सेंटरचे शिरूर येथे लोकार्पण ; बीडच्या रूग्णांचीही होणार सोय* *रूग्ण सेवेच्या कार्यात प्रत्येक कार्यकर्त्यांने सेवेची समिधा अर्पण करावी - पंकजाताई मुंडे*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व शांतीवनच्या आयसोलेशन सेंटरचे शिरूर येथे लोकार्पण ; बीडच्या रूग्णांचीही होणार सोय* *रूग्ण सेवेच्या कार्यात प्रत्येक कार्यकर्त्यांने सेवेची समिधा अर्पण करावी - पंकजाताई मुंडे* बीड । दिनांक १२। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि शांतीवन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने सुक्ष्म लक्षणे असलेल्या बीड व शिरूर येथील कोरोना बाधित रूग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरचे लोकार्पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. रूग्णसेवेच्या या कार्यात प्रत्येक कार्यकर्त्याने सेवेची समीधा अर्पण करावी असं आवाहन करत हे सेंटर रूग्णांसाठी परळीसारखचं माहेरघर होईल असं मत पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं.   कोरोना महामारीची जिल्हयातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांनी परळी, बीड व शिरूर येथे कोरोना रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली होती, त्यानुसार परळी येथे ३ मे रोजी सेंटर सुरू करण्यात आले तर बीड व शिरूर साठीचे १०० बेडचे सेंटर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान

MB NEWS-उद्या नटराज रंग मंदिर ला मिळणार नागरिकांना लस ;४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण

इमेज
  उद्या नटराज रंग मंदिर ला मिळणार नागरिकांना लस ;४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असुन उद्या दि.१३ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे ही लस उपलब्ध असणार आहे.केवळ ४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

MB NEWS-जगद ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरा घरात साजरी करा ...चंद्रप्रकाश हालगे

इमेज
  जगद ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरा घरात साजरी करा ...चंद्रप्रकाश हालगे  परळी..क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रतीवर्ष प्रमाणे अक्षयतृतिया ह्या दिवशी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते . या वर्षी करोना रोगाचा लॉकडॉऊन पार्श्वभूमीवर वर सर्व बसव भक्तांनी आप आपल्या घरी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजा च्या प्रतिमा च पूजन करून आपल्या घरीच सह कुटुंब सह परिवार मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन बसव प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रप्रकाश हालगे यांनी सर्व समाज बांधवाना केले आहे. करोना रोगाचं संकट या जगातून नष्ट व्हावे अशी प्रार्थना करून आपण घरीच राहून आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी ..जय बसव

MB NEWS- *सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी ठरतेय 'संजीवनी'....!* * *धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम कठिण काळात ठरतायत खरोखरच लोकोपयोगी*

इमेज
 *सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी ठरतेय 'संजीवनी'....!* *धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम कठिण काळात ठरतायत खरोखरच लोकोपयोगी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना अनेक व्यक्ती, संस्था पुढे येऊन मदत करत आहेत.कोरोनाचा वाढता कहर पाहता करोनाग्रस्त जनतेसाठी मदत म्हणून विविध क्षेत्रातील लोक काम करत आहेत. परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना रोखण्यासाठी 'संजीवनी' ठरत आहे.धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम या कठिण काळात खरोखरच लोकोपयोगी व लाभदायक ठरत आहेत.         परळीत प्रशासनाकडून सुरुवातीपासून अतिशय तत्परतेने काम करत आहे.त्याचबरोबरीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस,डीएम हेल्पलाईन आदी स्तरावरुन कोरोना काळातील सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे सध्या 'सेवाधर्म' उपक्रम राबविण्यात येत असुन यामध्ये सर्वंकष

MB NEWS- *परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण करण्याचे ठरवले आहे काय ? - सेवकराम जाधव*

इमेज
 *परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण करण्याचे ठरवले आहे काय ? - सेवकराम जाधव* परळी (प्रतिनिधी) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून लसीचा लाभ घेण्याचे आवाहन वारंवार आरोग्य विभागाकडून केले जात आहे. ऑनलाईन नोंदणी चा मुळात हेतू हा की शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्स पाळल्या जाऊन लसीकरण व्हावे. लसीकरणा दरम्यान कोरों ना 19 चा संसर्ग होता कामा नये परंतु फक्त ऑनलाईन नोंदणी वरच न थांबता ऑफलाइन नोंदणी पण बंधनकारक केली असल्याकारणाने लसीकरणाच्या लाभार्थ्यांना दोन दोन वेळा लसीकरण केंद्रावर चकरा कराव्या लागत आहेत. त्यातही परत लसीचे शॉर्टेज असल्याकारणाने दिवसभर रांगेत उभे राहून घरी परतावे लागते आणि याच्याही पुढे जाऊन आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून फक्त नाव नोंदणी केली पण व्यक्तीला लस मिळाली पण नाही अशांना ही लस घेतल्याचे संदेश व सर्टिफिकेट मिळत आहेत म्हणून प्रश्न असा पडतो की परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण मोहीम पूर्ण करावयाचे ठरवले आहे की काय ?  दैनिक जनशक्ती चे कार्यकारी संपादक सेवकराम जाधव यांनी आरोग्य विभागास असा प्रश्न केला आहे.            

MB NEWS-परळी शहरातील लसीकरणाचा गोंधळ थांबवून नागरिकांची गैरसोय दूर करा-श्रीनिवास देशमुख

इमेज
 ------------- परळी शहरातील लसीकरणाचा गोंधळ थांबवून नागरिकांची गैरसोय दूर करा-श्रीनिवास देशमुख ------------- परळी वैजनाथ, दि.11, (प्रतिनिधी) ः- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा गोंधळ त्वरित थांबवून लसीकरणाचे नियोजन करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी   सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे. परळी शहर व तालुक्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी परळी शहरात तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर वेळेवर लस पुरवठा होत नाही. आणि ज्या दिवशी लस दिली जाते त्या दिवशी कसलेही नियोजन केले जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना कडक उन्हात तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नेहमीच लस संपल्याची कारणे पुढे केली जातात. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सावली नाही यामुळे येथे गैरसोय अधिकच होत आहे. 45 वर्षावरील व त्याखालील नागरिकांच्या लसीकरणात पहिला व दुसरा डोस याचे नियोजन नाही. याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे, शहरातील लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ करावा अशी मागणी श्री देशमुख यांनी केली आहे.

MB NEWS-कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

इमेज
  कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा...... १५ मेपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढणार आहे की आहे त्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलथा मिळणार आहे? याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे.  कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या घटत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन वाढणार की, नियमांमधिये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.  'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही दुसरीकडे चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे.  तीन वेळा वाढवले निर्बंध  महाराष्ट्रात कोर

MB NEWS-तेलंगणात दहा दिवसांचा लाॅकडाऊन.. News by Govind Deshmukh

इमेज
  तेलंगणा राज्यात दहा दिवसांचा  लाॅकडाऊन घोषित; सकाळी ६ते१०वा.असणार सुट हैद्राबाद/गोविंद देशमुख.......       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तेलंगणा सरकारने राज्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे.दि.१२ ते २२ हे दरम्यान लाॅकडाउन असणार आहे.लाॅकडाउन काळात सकाळी ६ते१०वा. सुट असणार आहे.दरम्यान रात्रीची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.      याबाबत सरकारने आज घोषणा केली असुन लाॅकडाउनची नियमावली जाहीर केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.नागरीकांनी कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सरकारने केले आहे.

MB NEWS- सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक

इमेज
 सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सौ.जयश्री अशोक नावंदे रा.परचुंडी ह.मु.परळी वैजनाथ यांचे सोमवार दि.10 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्ष वयाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत.  सौ.जयश्री अशोक नावंदे यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी परचुंडी येथे अंत्यविधी करण्यात आले. परळी शहरातील आदर्श शिक्षक तथा संगम येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत.वीरशैव समाजातील धार्मीक, पारंपारिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.ं प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांच्या त्या वहिनी होत. नावंदे कुटूंबियांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.