युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*

 *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोना विषयक उत्साहात साजरी करण्यात आली.

             गाढे पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, रामेश्वर घेवारे व बन्सी सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुलिंग महाराज फुटके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जिवन कार्याचा आढावा मांडताना सांगितले की, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातीय व्यवस्था निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न केले. तर माजी सरपंच कांतराव सोनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती सर्वांसमोर मांडताना सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज अल्पायुषी ठरले पण त्यांना जेवढे जीवन मिळाले त्यात त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी प्राणांची बाजी लावून कार्य केले. ते धर्म रक्षक होते. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य जयवंत कराड, पत्रकार प्रविण फुटके, गणेश फुटके, लक्ष्मण अवधूत, नितीन घेवारे, धोंडीराम जगताप आदि उपस्थित होते. यावेळी कोविड विषयक शासनाच्या नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या