युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह

 बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. बीड जिल्ह्याचा आजचा दि.१२ कोविड अहवालात १२७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह ; परळीचा आजचा आहवाल ५८ पाॅझिटिव्ह आले आहेत.

         आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात १२७० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये परळी तालुक्याची संख्या ५८ आहे. कोरोना संसर्गाची साखळी मात्र संपुर्णतः तुटताना दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या