युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक

 सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन



आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

सौ.जयश्री अशोक नावंदे रा.परचुंडी ह.मु.परळी वैजनाथ यांचे सोमवार दि.10 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्ष वयाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत. 

सौ.जयश्री अशोक नावंदे यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी परचुंडी येथे अंत्यविधी करण्यात आले. परळी शहरातील आदर्श शिक्षक तथा संगम येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत.वीरशैव समाजातील धार्मीक, पारंपारिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.ं प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांच्या त्या वहिनी होत. नावंदे कुटूंबियांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या