युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-गुरुनाथ लांडगे यांचे निधन

 गुरुनाथ लांडगे यांचे निधन



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

       शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ रामलिंगआप्पा लांडगे (वय ८५) अल्प आजाराने शुक्रवारी (ता.१४) सकाळी निधन झाले.

               शहरातील हैद्राबाद बँक परिसरातील  

 रहिवाशी, प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ रामलिंगआप्पा लांडगे यांचे अल्प आजाराने निधन झाले. शुक्रवारी येथील विरशैव स्मशानभूमीत ११ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुनाथ लांडगे धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच शनि मंदिरात साजऱ्या होणाऱ्या शनैश्वर जन्मोत्सवात हिरीरीने सहभागी होत असत त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या