*ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे* *विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली - ना. मुंडे*

 *ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे*




परळी (दि. 14) ---- : आपल्या विनोदी शैलीतील कीर्तनातून अध्यात्म आणि समाज प्रबोधन या संयुगाची ख्याती राज्यभरात पसरवलेले, बीड जिल्ह्याचे भूषण विनोदाचार्य ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. दादांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादांचे कुटुंबीय व शिष्य परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे; अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 


वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांची त्यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनातून राज्यभरात ख्याती होती. त्यांच्या कीर्तनाच्या सीडी-कॅसेट्स, व्हीडिओ आजही प्रसिद्ध आहेत, तसेच कीर्तन सेवेत प्रमाण म्हणून वापरले जाणाऱ्या विनोदाचे त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. 


वारकरी संप्रदायाचे पाईक ह.भ.प. इंगळे दादा यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक प्रबोधनाची चळवळ राबवली. चिंचवडगाव येथील त्यांच्या आश्रमातील शिष्य, दादांचे कुटुंबीय यांच्या दुःखात आपण सहभागी असून, जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार