MB NEWS-सेवाधर्म उपक्रमांतर्गत आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द* *परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे मोफत वाटप*

 * सेवाधर्म उपक्रमांतर्गत आणखी दोन कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी सुपूर्द*



*परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे मोफत वाटप*


परळी (दि. 13) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या "सेवाधर्म" या उपक्रमात आज परळी शहरातील रमेश विश्वनाथराव लोखंडे व प्रकाश हरिभाऊ व्हावळे या दोन कुटुंबांतील कन्येच्या विवाहाला प्रत्येकी 10000 रुपये विवाह सहाय्यता निधी देण्यात आला. ना. मुंडे साहेबांच्या आईंच्या हस्ते या दोन कुटुंबांना विवाह सहाय्यता निधी देण्यात आला. 



यावेळी न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक केशव बळवंत, सभापती पाणी पुरवठा गोविंदराव मुंडे, सरचिटणीस अनंत इंगळे, दै. जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडभाने, दै. दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर, युवानेते शंकर कापसे, राष्ट्रवादी सेवा दल चे अध्यक्ष लालाखान पठाण, गिरीष भोसले, अमर रोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.



कोरोनाच्या प्रादुर्भावात सेवाधर्मच्या विविध उपक्रमामधून नागरिकांना आधार मिळत असल्याच्या प्रतिक्रिया परळीकर नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. आम्ही कोरोनाग्रस्त होतो तेव्हा आमचे काय होईल, आमच्या मुलीचं काय होईल, ही चिंता मनात घर करत होती, पण बरे होऊन आल्यावर लेकीच्या लग्नासाठी धनुभाऊंनी आर्थिक मदत दिली, आम्ही त्यांची ही मदत विसरणार नाही... असे सांगताना लोखंडे दाम्पत्यांचे डोळे पाणावले होते. 


कोरोना झालेल्या लोकांना कोणी जवळ करत नाही पण इथे आमच्या लेकराच्या लग्नाला तुम्ही मदत केलीत. धनुभाऊ व त्यांच्या आई यांचे आभार मानायला शब्दच नाहीत असे म्हणत प्रकाश व्हावळे यांना अश्रू अनावर झाले होते. या दोन्हीही कुटुंबांच्या पाणावलेल्या डोळ्यात साठलेले अश्रू व धनंजय मुंडे यांच्या साठी दाटलेल्या नजरेत भरलेला आशीर्वाद स्पष्ट दिसत होता.


दरम्यान आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना संजीवनी देणाऱ्या सर्वच हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांना टिफिन बॉक्स भेट देण्याचा एक उपक्रम सेवाधर्म अंतर्गत सुरू असून, यांतर्गत आज डॉ. सूर्यकांत मुंडे यांच्या मुंडे बाल रुग्णालय, डॉ. सतीश गुठे यांच्या समर्थ हॉस्पिटल व डॉ. मधुसूदन काळे यांच्या काळे हॉस्पिटल आदि ठिकाणी कार्यरत सर्वच आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्स भेट देण्यात आले. 


यावेळी रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी शिक्षक आघाडीचे अजय जोशी सर, सचिव आरगड़े सर, नगरसेवक अय्यूबभाई पठाण, शहर सरचिटणीस अनंत इंगळे, शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, प्रणव परळीकर, रवि मुळे, ज्ञानेश्वर होळंबे, अमर रोडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार