युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण करण्याचे ठरवले आहे काय ? - सेवकराम जाधव*

 *परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण करण्याचे ठरवले आहे काय ? - सेवकराम जाधव*



परळी (प्रतिनिधी)

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून लसीचा लाभ घेण्याचे आवाहन वारंवार आरोग्य विभागाकडून केले जात आहे. ऑनलाईन नोंदणी चा मुळात हेतू हा की शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्स पाळल्या जाऊन लसीकरण व्हावे. लसीकरणा दरम्यान कोरों ना 19 चा संसर्ग होता कामा नये परंतु फक्त ऑनलाईन नोंदणी वरच न थांबता ऑफलाइन नोंदणी पण बंधनकारक केली असल्याकारणाने लसीकरणाच्या लाभार्थ्यांना दोन दोन वेळा लसीकरण केंद्रावर चकरा कराव्या लागत आहेत. त्यातही परत लसीचे शॉर्टेज असल्याकारणाने दिवसभर रांगेत उभे राहून घरी परतावे लागते आणि याच्याही पुढे जाऊन आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून फक्त नाव नोंदणी केली पण व्यक्तीला लस मिळाली पण नाही अशांना ही लस घेतल्याचे संदेश व सर्टिफिकेट मिळत आहेत म्हणून प्रश्न असा पडतो की परळीच्या आरोग्य विभागाने फक्त कागदावरच लसीकरण मोहीम पूर्ण करावयाचे ठरवले आहे की काय ?

 दैनिक जनशक्ती चे कार्यकारी संपादक सेवकराम जाधव यांनी आरोग्य विभागास असा प्रश्न केला आहे.



           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या