युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा

 परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा 




परळी वैजनाथ - सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील ब्राम्हण महिला मंच तर्फ साजरा करण्यात आला.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करून भगवान परशुरामांना यावेळी वंदन करण्यात आले.श्री विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.


परशुराम स्त्रोत्राचे 11 वेळा पठण करून आरती व मंत्रपुष्पांजली करत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.पहले ब्राम्हण होने पर गर्व था, अब ब्राम्हण होने पे घमंड है.. पंडित की संतान है हम. इतना रुतबा रखते है . इतिहास क्या चीज है . हम तो भूगोल बदलने का दम रखते है जय परशुराम - जय श्री राम अशा घोषणा यावेळी देण्यात आला.यावेळी ब्राम्हण महिला मंच परळी अध्यक्षा वर्षा जोशी,किर्ती धोंड,सुमेधा जोशी,अर्चना दगडगुंडे,शोभा कुलकर्णी,विद्या खिस्ते आदि महिलांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या