युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे

 पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा



ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 परळी शहरासह तालुक्यातील लसिकरण केंद्रावर लस उपलब्ध करुन देण्यात आली असुन येणार्या काळात सर्व नागरीकांचे लसिकरण पुर्ण होण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लसींचा साठा उपलब्ध करु असे पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले. शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रांना भेटी देवुन आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.

   सध्या उपलब्ध असलेल्या लसींमधून ज्या नागरिकांना पहिला डोस देऊन विहित वेळ पूर्ण झाली आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक असल्याने परळी तालुक्यातील नटराज रंगमंदिर व प्रा आ केंद्र मोहा, प्रा आ केंद्र पोहनेर , प्रा आ केंद्र सिरसाळा प्रा आ केंद्र धर्मापुरी, प्रा आ केंद्र नागापूर येथील लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील दुसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला. शुक्रवारी दि.14 मे रोजी सभापती बालाजी मुंडे यांनी शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रास भेट दिली.परळी तालुक्यातुन आतापर्यंत आरोग्य केंद्रातील लसिकरण केंद्र आतापर्यंत पहिला व दुसरा डोस 35 हजार नागरीकांना लस देण्यात आली आहे.सुरुवातीस कोरोनावरील लसिबाबत जागृती नसल्याने नागरीकांचा लस घेण्यास तेवढा प्रतिसाद नव्हता.आता लसिकरणासाठी नागरीक गर्दी करत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडुन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन लसींचा आवश्यक तो साठा उपलब्ध करु असे बालाजी मुंडे यांनी सांगितले. लसीकरण केंद्रावर भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रत्येक केंद्रावर नागरिकांना सुरळीत लस देण्यात यावी असे नियोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मोराळे, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिशा मुंडे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या