MB NEWS- *सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी ठरतेय 'संजीवनी'....!* * *धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम कठिण काळात ठरतायत खरोखरच लोकोपयोगी*

 *सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी ठरतेय 'संजीवनी'....!*



*धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम कठिण काळात ठरतायत खरोखरच लोकोपयोगी*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

       कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना अनेक व्यक्ती, संस्था पुढे येऊन मदत करत आहेत.कोरोनाचा वाढता कहर पाहता करोनाग्रस्त जनतेसाठी मदत म्हणून विविध क्षेत्रातील लोक काम करत आहेत. परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना रोखण्यासाठी 'संजीवनी' ठरत आहे.धनुभाऊंचा सेवाधर्म - ताईंचा सेवायज्ञ-अन्य संस्थांचे उपक्रम या कठिण काळात खरोखरच लोकोपयोगी व लाभदायक ठरत आहेत.

        परळीत प्रशासनाकडून सुरुवातीपासून अतिशय तत्परतेने काम करत आहे.त्याचबरोबरीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस,डीएम हेल्पलाईन आदी स्तरावरुन कोरोना काळातील सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे सध्या 'सेवाधर्म' उपक्रम राबविण्यात येत असुन यामध्ये सर्वंकष सेवा उपक्रमांचा समावेश आहे. माजीमंत्री भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून 'सेवायज्ञ' सुरू केला आहे. कोरोना बाधितांसाठी केअर सेंटर, कोरोना बाधितांच्या कुटुंबांना घरपोहच जेवणाचे डब्बे पुरवणे,मोफत वाहन व्यवस्था,अॅम्ब्युलन्स आदी कार्य सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवाधर्म अंतर्गत प्रत्येक खाजगी रुगणालायत दाखल असलेल्या रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते, जेवण, रेमडीसीविर इंजेक्शन अन्य औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात फोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. 

        याशिवाय सप्तशृंगी सेवाभावी संस्थेने ५० बेडचे पंडितअण्णा मुंडे कोविड केअर सेंटर सुरू केले असुन याठिकाणी कोरोनाबाधितांची आलगीकरण व सर्व काळजी घेतली जात आहे. शासकीय कोविड केअर सेंटर डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनु.जाती जमाती शासकीय वसतिगृह येथे अगोदरपासूनच सुरू आहे.याठिकाणी शासकीय सेवाकार्य सुरू आहे.उपजिल्हा रुग्णालयात नव्याने ५०आॅक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित सेवाधर्म उपक्रमांतर्गत महिलांसाठी स्वतंत्र १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरातील अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेही गेल्यावर्षी च्या कोरोनाकाळा पासुन अन्नदानाचे कार्य सुरू आहे. कै.मोहनलाल बियाणी अन्नछत्राच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाची व विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. 

          राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित सेवाधर्म उपक्रमांतर्गत लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने ही मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पोतदार लर्न स्कुलनेही मोफत बससेवा सुरू केली आहे. बालाजी गायकवाड या सामाजिक कार्यकर्त्या ने रुग्णांना घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे.तर नागनाथअप्पा भाग्यवंत या रिक्षाचालकांने आपल्या रिक्षाची मोफत सेवा सुरू केली आहे. अन्य विविध संस्था,युवकांचे ग्रुप यांनी मास्क वाटप, सॅनिटायझर वितरण,कोविड यौद्ध्यांसाठी सेवा असे सेवाकार्य सुरूच आहे.सेवाधर्म अंतर्गत शहरातील फूड प्लाझा येथे राष्ट्रवादी आधार केंद्र उभारण्यात आले असून, याद्वारे आवश्यक तिथे निर्जंतुकीकरण फवारणी, नागरिकांना लसीकरण साठी मदत, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे.कोरोना बाधित झालेल्या गरीब व गरजू कुटुंबातील विवाहकार्यासाठी सेवाधर्म अंतर्गत 10 हजार रुपये मदतनिधी देण्यात येत आहे.

@@

   विविध कोरोना केअर सेंटरमध्ये परळीत सध्या ११२ कोरोना रुग्ण....

     परळीत सुरू करण्यात आलेल्या विविध कोरोना केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत एकुण ११२ कोरोना रुग्ण शरीक आहेत. 

  •कै. पंडीत अण्णा मुंडे कोविड केअर सेंटर- 8 रुग्ण

 • शासकीय कोविड केअर सेंटर- 380रुग्ण

 •गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कोविड केअर सेंटर- 58 रुग्ण

  •राष्ट्रवादी काँग्रेस सेवाधर्म महिला कोविड केअर सेंटर-8रुग्ण

  @@@ 

    अन्नदान.....घरपोहच जेवणाचे डब्बे

     दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोनाबाधित रुग्ण,त्यांचे कुटुंबीय यांना नियमित जेवणाचे डब्बे पुरवण्यात येत आहेत.तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातूनही सध्या १०४ जेवणाचे डब्बे घरपोहच करण्यात येत आहेत.अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट,कै.मोहनलाल बियाणी अन्नछत्राच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात येत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार