MB NEWS- *पंकजाताई मुंडेंनी कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञाचे पत्रकारांनी केले कौतुक !* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला दिली भेट ; रूग्णांचीही केली आस्थेवाईकपणे विचारपूस*

 *पंकजाताई मुंडेंनी कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञाचे पत्रकारांनी केले कौतुक !*



*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला दिली भेट ; रूग्णांचीही केली आस्थेवाईकपणे विचारपूस* 


परळी । दिनांक १३।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कोरोना बाधित रूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा यज्ञ उपक्रमांचे शहरातील पत्रकारांनी कौतुक केले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरला आज भेट देऊन पत्रकारांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच रूग्णांची देखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली.


   पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी ३ मे पासून सेवा यज्ञ सुरू केला आहे. प्रतिष्ठानच्या शंभर बेडच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमध्ये निवास, भोजन, औषधोपचार, तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून वेळोवेळी तपासणी अशी रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोणत्याही रूग्णाला एक रूपया देखील खर्च करावा लागत नाही, सर्व व्यवस्था प्रतिष्ठान कडून मोफत केली जात आहे. आतापर्यंत या सेंटरमध्ये ९० रूग्ण दाखल झाले होते, त्यापैकी ५५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. 



कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या या सेंटरला शहरातील पत्रकारांनी आज भेट देऊन पाहणी केली तसेच रूग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. औद्योगिक वसाहतीमधील भोजन कक्षालाही त्यांनी भेट दिली व भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. प्रतिष्ठानने सुरू केलेला हा सेवा यज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे, इथली व्यवस्था व सकारात्मक वातावरण यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.



यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, डाॅ. वंगे, डाॅ. दंडे, डाॅ. लोहिया, डाॅ. पाठक, डाॅ. दुष्यंत देशमुख, संदीप,लाहोटी, राजेंद्र ओझा, सचिन गिते, मोहन जोशी, अरूण पाठक, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, नरेश पिंपळे, गोविंद चौरे, नरसिंग सिरसाट, फुलचंद मुंडे, विजयकुमार खोसे, आश्विन मोगरकर, वैद्यनाथ कारखान्याचे तुकाराम गडदे, अभिजीत गुट्टे, नंदकुमार घुगे, अनंत चाटे, वैजनाथ पवार आदी यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !