MB NEWS-परळी शहरात फिरत्या अन्नछत्रचा शुभारंभ राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम

 परळी शहरात फिरत्या अन्नछत्रचा शुभारंभ



राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम


परळी । प्रतिनिधी


लॉकडाऊनच्या कार्यकाळात हातावर पोट असलेले कामगार, घरामध्येच विलगीकरणात असलेले कोरोना रूग्न व त्यांचे नातेवाईक तसेच परळी शहरात असलेल्या भिक्षुकरूंसाठी गेल्या दीड वर्षापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठान संचलित स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या माध्यमातून मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर परळी शहरात याच उपक्रमाच्या माध्यमातून फिरत्या अन्नछत्र अभियानाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आला, यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


राधा-मोहन साथी प्रतिष्ठान संचलित स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या फिरत्या अन्नछत्र अभियानाचा शुभारंभ शुक्रवार, दि.१४ रोजी करण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशीच अक्षय्य तृतीया असल्याने गरजूंसाठी जे जेवण पाठविण्यात आले होते त्यात आंबरस व पोळीचा स्वयंपाक होता. यावेळी बोलतांना जेष्ठ विधीज्ञ ॲड.जिवनराव देशमुख म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रचे विविध उपक्रम पाहत आहोत. अतिशय गरजेच्या वेळी राबवत असलेले अभिनव उपक्रम हे असहाय्य नागरीकांसाठी उपयुक्त ठरत आहेत.


माजी नगरसेवक राजेंद्र सोनी म्हणाले की, जे आपण घरी जेवतो त्याप्रमाणेच गरजू लोकांना तसेच जेवण देणे ही गोष्ट त्यांना आनंद देण्यासारखीच आहे. आजच्या काळात हे अत्यंत गरजेचे असून, स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या माध्यमातून गरजूंसाठी राबविले जाणारे उपक्रम अडचणीत असलेल्या लोकांसाठी तर आहेतच परंतू पशु-पक्षांसाठी चारा-पाण्याचीसुध्दा व्यवस्था अन्नछत्रच्या माध्यमातून करून त्यांचीसुध्दा काळजी घेतली जात आहे हे विशेष आहे. आज संपन्न झालेल्या फिरत्या अन्नछत्रच्या शुभारंभ प्रसंगी अनेकांनी आपले मत व्यक्त केले. दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा आरोग्य मित्रचे राज्य अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सतिश सारडा, नामवंत विधिज्ञ जीवनराव देशमुख, अतुल तांदळे, जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, बालकिशन सोनी, दै.मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, संपूर्ण बियाणी परिवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार