MB NEWS-कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

 कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय





मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा......


१५ मेपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढणार आहे की आहे त्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलथा मिळणार आहे? याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे. 


कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या घटत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन वाढणार की, नियमांमधिये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 


'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही दुसरीकडे चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. 


तीन वेळा वाढवले निर्बंध 


महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने ५ एप्रिलला कठोर नियम लागू केले. पुन्हा १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने हे निर्बंध १५ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्यण घेतला. आता १५ मेनंतर राज्य सरकार काय निर्यण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !