MB NEWS-बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला हात घालून केले विवस्त्र ! ⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛

 बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला  हात घालून केले विवस्त्र !



⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     संवेदनशील मनाला रुखरुख लागून जाईल अशा काही घटना अवतीभवती नेहमीच घडतात.साध्या सरळ व सामान्य दिसणार्या या घटना मात्र कधीकधी मनात रुतुन जातात.अशाच प्रकारची घटना परळीतील संवेदनशील मनाच्या एका छायाचित्रकाराला अनुभवायला मिळाली आहे. या घटनेने मनाच्या खोलवर ही वेदना भळभळत असुन जिवापाड जपलेल्या एका वृक्षाची बहरात असताना झालेली छाटणी या छायाचित्रकाराला बैचेन व हतबल करुन टाकत आहे. अंगभर साज,शृंगाराला हात घालून विवस्त्र करावे असेच या झाडाबाबत घडल्याची खंत व्यक्त होत आहे.

      सध्याच्या वातावरणामध्ये आॅक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला लक्षात आले आहे.आॅक्सिजन मिळवण्यासाठी नाही नाही ते करावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन चळवळ उभी करून अधिकाधिक झाडांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.परळीतही २०११ मध्ये फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली.या अंतर्गत परळीतील सर्व परिचित छायाचित्रकार सुनील फुलारी यांनी आपल्या घरासमोर एक वृक्ष लावला. फुलारी कुटुंबाने घरातील एका सदस्याप्रमाणे या झाडाचे संगोपन केले. तो वृक्ष आज विस्तार होऊन प्रचंड चाळीस ते पन्नास फुटापर्यंत गेलेला,डेरेदार झाड, हिरव्याकंच पानांनी बहरलेला अन् आपल्याच डौलाने इतरांना सावली देत उभा होता. परंतु या वृक्षाची वाढ वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करु शकते म्हणून महावितरणच्या विभागाने बेमुर्वतपणाने हे झाड छाटुन टाकले. 

                 जीवापाड काळजी घेणारा या वृक्षमित्र छायाचित्रकाराला ही घटना मनाला रुखरुख लावणारी ठरली आहे. त्यातही आणखी उदासी निर्माण करणारी घटना म्हणजे फुलारी कुटुंबातील काही सदस्य हे कोरोनाशी लढा देत असुन आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल आहेत.त्यांची काळजी घेताना घरासमोर तोडलेल्या फांद्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत.तोडलेल्या झाडाच्या फांद्या घरासमोर अस्ताव्यस्त पडल्याने अगदी घरातून बाहेर येणेही मुश्किल झालेले आहे. मोटारसायकल वाहन बाहेर काढता येत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तब्बल दोन दिवस होऊन गेले तरीही दोन तासात सगळा वृक्षाचा हा पसारा उचलून घेऊन जातोत म्हणणारे महावितरणचे कर्मचारी अजून कोणीही आलेले नसल्याने त्रास होत असल्याचे फुलारी यांनी सांगितले.

 ⬛

2011 रोजी माझ्या घरासमोर मी परळी फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व सभासदांच्या साक्षीने लावलेला  त्या वृक्षाची जोपासणा करताना या वृक्षाला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याचे अभिवचन देणारा मी आज हतबल झालो.सध्याचा काळ ना सण साजरे करायचा उत्साह ना कसला आनंद. त्यातच परिवारात एखादी दुःखद घटना घडली ते वातावरण अजूनच गर्द होत आहे.

                     -सुनील  फुलारी  

        सचिव: परळी फोटोग्राफर असोशियन.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार