पोस्ट्स

MB NEWS- *कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने तेजस्विनी सावंत हिला मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव*

इमेज
 *कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने तेजस्विनी सावंत हिला मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव* परळी वैजनाथ /परभणी (प्रतिनिधी) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2021 परीक्षेत एम.ए मानसशास्त्र विषयात येथील बी. रघुनाथ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु सावंत तेजस्विनी उत्तम हि विद्यापीठात सर्वप्रथम आलेली असल्यामुळे कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने गौरविण्यात आले .  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात नादेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ उद्धव भोसले प्र कुलगुरू जोगेंद्र सिंह बिसेन कुलसचिव सर्जेराव शिंदे परीक्षा नियंत्रक रवि सरोदे यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक बहाल करण्यात आले, तीच्या या यशाबद्दल गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड . अशोक सोनी उपाध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव ओमप्रकाश डागा, सहसचिव अनिल हराळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास सोनवणे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ नागोराव पाळवदे डॉ गणेश वायकोस तसेच महाविद्यालयातील सर्व

MB NEWS-सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर

इमेज
  सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर परळी (प्रतिनिधी) सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्था महाराष्ट्र राज्यची त्रैमासिक तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेत संस्थेच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी येथील पत्रकार संजय क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.         सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय राजाभाऊ संगमनेरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सोलापूरचे गुरूदत्त प्रभू चव्हाण यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कोकण विभागीय उपाध्यक्षपदी चिपळूणचे संदीप मनोरकर यांची तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी परळी येथील पत्रकार तथा किसान ट्रॅक्टर स्पेअर चे संचालक संजय क्षीरसागर यांची सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली. तसेच विशेष सभासद म्हणून अंबादास दिल्लीकर यांची नियुक्ती करण्यात आली.         मोहनरावजी पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये लातूर येथील समाजाच्या जनगणना सूची चे अनावरण करण्यात आले. तसेच जात पडताळणी समितीची स

MB NEWS- *धारदार शस्त्राने गळा चिरून ३५ते४०वर्षिय इसमाची हत्या* *पाय बांधलेला व शस्त्रांचे वार असलेला मृतदेह सिरसाळ्याजवळ वांगी तलावात आढळला *

इमेज
 ⬛ धारदार शस्त्राने गळा चिरून ३५ते४०वर्षिय इसमाची हत्या* 🌑 पाय बांधलेला व शस्त्रांचे वार असलेला मृतदेह सिरसाळ्याजवळ वांगी तलावात आढळला  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        धारदार शस्त्राने गळा चिरून व शरीरावर इतर ठिकाणी शास्त्राचे वार करत एका 35 ते 40 वर्षीय अज्ञात इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सिरसाळा जवळील बीड रस्त्याच्या उत्तर बाजूला असलेल्या वांगी तलावात दोरीने पाय बांधलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.             याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास सिरसाळा- बीड रस्त्यावर उत्तर बाजुला असलेल्या वांगी तलावात 35 ते 40 वर्षीय इसमाचे प्रेत आढळून आले. हा मृतदेह काढला असताता या मृत इसमाचे दोन्ही पाय घोट्याजवळ बांधून तलावात फेकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याचप्रमाणे मृत इसमाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार असल्याचेही दिसून आले आहे. यामध्ये कानाच्या डाव्या बाजूस शस्त्राचा वार असून धारदार शस्त्राने गळा चिरण्यात आल्याचे द

MB NEWS-प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता..

इमेज
  प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांच्या मार्फत श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्राध्यापक डाॅ. विठ्ठल रामकिशन भोसले यांना शारिरीक शिक्षण विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.  सन 2012 मध्ये त्यांनी आपले एम. फिल. शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले व संशोधनाची खरी सुरुवात केली.  सन 2013 मध्ये त्यांनी आपले शारिरीक शिक्षण या विषयात पी.एच.डी चे संशोधन कार्य  शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले.  सन 8 मार्च 2016 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून त्यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ येथे स्पोर्ट्स ट्रेनर, रिसर्च असोसिएट यापदावर काम केले. त्यानंतर अन

MB NEWS-दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड* *दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे* *जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

इमेज
 * दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड* *दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे*  *जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त  नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*    परळी  वैजनाथ (प्रतिनिधी) :-     महाराष्ट्रातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी डॉ.संतोष मुंडे हे सतत कार्यरत असतात दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य हे अद्वितीय असल्याचे प्रतिपादन परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले. दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.       शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते व तहसिलदार सुरेश शेजुळ यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचे  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उप

MB NEWS-नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे,बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता*

इमेज
 * नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सन २०१५ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगड येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद परळीत उमटले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.याप्रकरणी पोलिसांनी पदाधिकार्यांवर नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा आदी दोषारोप ठेउन गुन्हे दाखल केले होते.याप्रकरणात परळी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.            तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर श्रीक्षेत्र भगवान गड येथे 4 जानेवारी 2015 रोजी  दगडफेक झाली होती. याचे पडसाद म्हणून परळी येथील राष्ट्रवादीचे तात्कालीन नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तात्कालीन शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी तसेच नगरसेवक शकील कुरेशी,अझिझ कच्छी, पदाधिकारी अनंत इंगळे, शंकर कापसे,कादर कुरे

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛      *दि.२ डिसेंबर २०२१* मेष – कौटुंबिक वादविवाद मिटतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराची साथ लाभेल. मनासारख्या घटना घडतील. वृषभ – शत्रू नामोहरम होतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. मिथुन – जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. कर्क – वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामांमध्ये अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा. सिंह – आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल. कन्या- आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मविश्‍वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. तुळ – आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अतिथ्यामधे दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात. एकंदर लाभदायक दिवस. वृश्‍चिक – कर्जदार

MB NEWS-अगोदर लस द्या मग नोंदणी करा - चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन

इमेज
  अगोदर लस द्या मग नोंदणी करा - चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन औरंगाबाद (प्रतिनिधी-) राज्यात कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सूरू आहे. आपल्यासह सर्व प्रशासन व इतरही समाजातील घटक लसीकरणासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र लसीकरणात नंबर एकवर पोहचला आहे. पण यात सध्या प्रचंड मोठा घोळ सूरू आहे. तो म्हणजे अनेक नागरिक फक्त नोंदणी करून लस न घेताच केंद्राबाहेर पडत आहेत. त्यामूळे हे त्यांच्यासाठी तर धोकादायक आहेच शिवाय इतरांसाठीही धोकादायक ठरणार आहे. तसेच हे लोक एकप्रकारे शासनाची फसवणूकही करत आहेत. त्यामुळे आरोग्य मित्र महाराष्ट्रची अशी मागणी आहे की, आगोदर लस देण्यात यावी, नंतरच नोंदणी करण्यात यावी. जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य मित्र महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.  या निवेदनावर आरोग्य मित्र महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंजुताई दर्डा,  महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. पापालाल

MB NEWS-रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे निधन पत्रकार नागोराव कराड यांना मातृशोक

इमेज
  रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे निधन पत्रकार नागोराव कराड यांना मातृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील पत्रकार नागोराव (बाळासाहेब) कराड यांच्या मातोश्री श्रीमती रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे आज बुधवारी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते.       इंजेगाव येथील श्रीमती रत्नमालाबाई कराड या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच आज बुधवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल इंजेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.       स्व. रत्नमालाबाई कराड यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कराड परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे*

इमेज
 * जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.             मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. शहरातील श्रीनाथ हाँस्पिटल अरुणोदय मार्केट समोर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचे काँम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत शिबिराचा वेळ आहे.या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.याम

MB NEWS- *जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे*

इमेज
 *जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.             मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. शहरातील श्रीनाथ हाँस्पिटल अरुणोदय मार्केट समोर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचे काँम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत शिबिराचा वेळ आहे.या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.यामध

MB NEWS-*वैद्यनाथ कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलित ! *शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला - पंकजाताई मुंडे*

इमेज
 * वैद्यनाथ कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलित ! *शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला - पंकजाताई मुंडे* *कारखाना सर्वांचाच ; राजकारण करून अडथळा होणार नाही असेच सर्वांनी वागावे*  परळी ।दिनांक ३०। वैद्यनाथ साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यांचे नांव याच्याशी जोडले गेले आहे. हा कारखाना सर्वाचाच आहे, शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत मी हा कारखाना सुरू करतेयं. तथापि, यात कुणीही  राजकारण करता कामा नये. अडचण निर्माण होणार नाही असेच सर्वांनी वागावे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.    वैद्यनाथ साखर कारखान्याचा २१ वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज अतिशय साध्या पध्दतीने मोठया उत्साहात पार पडला, त्यावेळी सभासद शेतकऱ्यांसमोर त्या बोलत होत्या.   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, वैद्यनाथ साखर कारखाना हा सभासद, शेतकरी आणि कर्मचारी असा सर्वांचाच आहे. गेल्या कांही वर्षापासून साखरे

MB NEWS-एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....... आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे.

इमेज
एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे. वैद्यनाथ मंदिर असो की अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थान यांना थेट मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र पाठवून खळबळ उडवून देणारा आणि ही उठाठेव प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून करणारा एक शिक्षक असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.            नांदेड येथील सिडको परिसरातील एक शिक्षक असणाऱ्या व्यक्तींने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास या गुरुजींनी सुरुवात केली.  कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रातनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा या गुरु

MB NEWS- *प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द*

इमेज
प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग पोलिसांकडे जमा केली व ज्याची होती त्याला सुपुर्द करण्यात आली.एका हाॅटेल चालकाने हा प्रामाणिकपणा दाखवला.त्याबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार करुन कौतुक केले.        प्रामाणिक माणसेही आजही आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण शनिवारी परळीत घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. विशाल हॉटेलचे संचालक दत्ता लहूदास मुंडे यांनी हा प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे. अंबाजोगाई येथील रहिवासी शेख सादेक हे परळीहून अंबाजोगाईला  रिक्षाने जात होते. आपली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस  ठेवली. अंबाजोगाई येथे पोचल्यानंतर रिक्षातून उतरत असतांना आपली बॅग नसल्याचं लक्षात आलं.  परळी ते अंबाजोगाई रोडवर कण्हेरवाडी येथील विशाल हॉटेलचे मालक दत्ता लहूदास मुंडे यांना हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर बॅग पडलेली आढळून आली. बॅग त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. बॅग मालकाचा शोध घेतला.बॅगमधील महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम 65 हजार रुपये शेख

MB NEWS-प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

इमेज
  प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले परळी वैजनाथ/प्रतिनिधी महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू सेठ)यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले.   नागापूर जिल्हा परिषद गटातील नागापूर,मांडेखेल , अस्वल आंबा तडोळी दौनापूर वानटाकळी ,मोहा, गडदेवाडी ,कावळेवाडी तसेच परिसरातील संतप्त शेतकरी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन केले आंदोलन करताच सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.    परळी कार्यालयातील महावितरणचे उप अभियंता मा. आंबडकर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तोडलेले कृषी पंपाचे कनेक्शन पूर्ववत करणार अशी ग्वाही दिली.       या आंदोलनास संबोधित करताना प्रदीप भैया मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत लोकनेते प्रा. टी.पी.मुंडे (सर)यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न

MB NEWS- *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*

इमेज
 *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*  परळी वैजनाथ,...        बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.         शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर,

MB NEWS-कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे

इमेज
  कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.         🕳️अशी आहे ना.धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट.......      श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री ना. श्री. दिलीप वळसे पाटील साहेब, डिजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे.  कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे

MB NEWS-*'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड* 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू

इमेज
 '५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...              आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने परळीत एकच खळबळ उडालीय.              संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात कडून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीसांनी तपासाची सूत्र हलवली आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव  हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत ह

MB NEWS-26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

इमेज
  26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम परळी | प्रतिनिधी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल 22 जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी  रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. आज शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. सदरील शिबिरात रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील डॉ.अनुराधा डाके, शशिकांत पारखे, शेख, अफसर, यादव या

MB NEWS-जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*

इमेज
 * जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*         परळी वैजनाथ परळी वैजनाथ येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन व मुबंईच्या अतिरेकी हल्यात शहीदाना श्रद्धांजली अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले तर मुबंई येथील 26/11च्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रध्दांजली अर्पण करून शहीद दिन साजरा केला. या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे म्हणाले की समाजातील स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत या सर्वांना समान अधिकार देऊन सर्वसामान्य माणसाला सर्वच पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारे जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे आहे. या वे

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संविधान दिन उत्साहात साजरा*

इमेज
  *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संविधान दिन उत्साहात साजरा* सोनपेठ दि.२६ (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा  येथे  संविधान दिन साजरा करण्यात आला.           कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या संविधान दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री आर. बी.जोशी, एस.एम. राठोड, एस.जी.चव्हाण, व्ही.पी. महाजन,एन.आर. निळे, हारगिले इ.एन.धनंजय भिसेगावकर,शुभम चाकुरे, लक्ष्मण आडे,मनिष चव्हाण, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

MB NEWS- *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

इमेज
 *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा* परळी वै:दि 26 प्रतिनिधी         परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त *संविधान जनजागृती अभियान* राबविले.      या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनी विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून *संविधान जनजागृती* केली विद्यार्थ्यांच्या हातातील फलक व घोषणाबाजी लक्ष्यवेधी ठरली.यानंतर गावातील मुख्य जागेवर संविधानाबद्दल शाळेचे पर्यवेक्षक विनायक राजमाने यांनी परिपूर्ण माहिती दिली.या नंतर शाळेत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देहमुख, सुदाम शिंदे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र हरदास आदी मंचावरउपस्थित होते यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक मुरलीधर बोराडे यांनी संविधान

MB NEWS- *पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती*

इमेज
पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती मुंबई ।दिनांक २५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. भोपाळ येथे आज व उद्या होणाऱ्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्या पूर्णवेळ उपस्थित असणार आहेत.     मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची व विधिमंडळ सदस्यांची दोन दिवसीय बैठक भोपाळ येथे आजपासून होत आहे. मध्यप्रदेश भाजपच्या सह प्रभारी असल्याने या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे आज सकाळी विमानाने भोपाळ येथे दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर आगमन होताच  प्रदेश सरचिटणीस कविता पाटीदार, जिल्हाध्यक्ष सुमीत पचौरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यानंतर बैठकीसाठी प्रदेश कार्यालयाकडे त्या रवाना झाल्या. बैठकीत प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, सरचिटणीस भगवानदास सबनानी यांनी त्यांचे स्वागत केले. ••••

MB NEWS-प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन

इमेज
  प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन *अन्यथा तीव्र आंदोलन करणार* परळी वै:दि 24 प्रतिनिधी   सेवांतर्गत प्रशिक्षण हा शैक्षणिक प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या शिक्षक कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रूपये शुल्क आकारण्याचा फतवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढला असून शुल्क आकारणी ताबडतोब रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी. पवार आणि राजकुमार कदम,बंडू अघाव  यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.         या बाबतीत मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली अधिक माहिती अशी की बारा व चोवीस वर्षांच्या अर्हताकारी सेवे नंतर शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करते. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षण ही महत्त्वाची अट असल्याने

MB NEWS- *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले

इमेज
 *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले परळी--(प्रतिनिधी)      पेट्रोल आणि डिझेल चे भाव १०० रुपयाच्या पूडे गेल्यामुळे परळी शहरातील अँटोचे भाडे वाढविण्यात आले असून प्रवाशांसाठी ती एक समस्या होऊन बसली आहे.या अँटो भाडे संदर्भात शहर ट्राफिक पोलिसांनी पूढाकार घेऊन दरपत्रक निश्चित करणे गरजेचं असल्याचे मत युवा नेते मुन्ना बागवाले यांनी व्यक्त केले आहे.          या संदर्भात पूढे बोलताना ते म्हणाले की, परळी शहराचे बसस्टॅंड आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळचं आहे. तेथून परळीच्या कोणत्याही कोपर्‍याकडे जाण्यासाठी जवळपास  २ की.मी. चे अंतर पडते. प्रवाशांना अँटो केल्यानंतर पुर्वी जे भाडे द्यावे लागत होते त्यात गेल्या कांही दिवसापासून पेट्रोल व डिझेलमुळे भाडेवाढ झालेली आहे.                     *अडवणूक ?*           हे जरी खरे असले तरी अनेक वेळा वयस्क प्रवासी, महीला तसेच प्रवाशांसोबत सामानांच्या बॅगा पाहून कांही अँटोवाले त्यांना आव्वाच्यासव्वा भाडे सांगत असल्याची अनेक प्रवाशांकडून तक्रार होताना दिसत आहे. अशाप्रकारे अडवून घेतलेले भाडे प्रवाशांना देणे भाग पडत असून त्यांना विनाकारण