परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
*कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने तेजस्विनी सावंत हिला मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव*
परळी वैजनाथ /परभणी (प्रतिनिधी) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2021 परीक्षेत एम.ए मानसशास्त्र विषयात येथील बी. रघुनाथ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु सावंत तेजस्विनी उत्तम हि विद्यापीठात सर्वप्रथम आलेली असल्यामुळे कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने गौरविण्यात आले .
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात नादेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ उद्धव भोसले प्र कुलगुरू जोगेंद्र सिंह बिसेन कुलसचिव सर्जेराव शिंदे परीक्षा नियंत्रक रवि सरोदे यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक बहाल करण्यात आले, तीच्या या यशाबद्दल गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड . अशोक सोनी उपाध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव ओमप्रकाश डागा, सहसचिव अनिल हराळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास सोनवणे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ नागोराव पाळवदे डॉ गणेश वायकोस तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा