MB NEWS- *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले

 *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले

परळी--(प्रतिनिधी)

     पेट्रोल आणि डिझेल चे भाव १०० रुपयाच्या पूडे गेल्यामुळे परळी शहरातील अँटोचे भाडे वाढविण्यात आले असून प्रवाशांसाठी ती एक समस्या होऊन बसली आहे.या अँटो भाडे संदर्भात शहर ट्राफिक पोलिसांनी पूढाकार घेऊन दरपत्रक निश्चित करणे गरजेचं असल्याचे मत युवा नेते मुन्ना बागवाले यांनी व्यक्त केले आहे.

         या संदर्भात पूढे बोलताना ते म्हणाले की, परळी शहराचे बसस्टॅंड आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळचं आहे. तेथून परळीच्या कोणत्याही कोपर्‍याकडे जाण्यासाठी जवळपास  २ की.मी. चे अंतर पडते. प्रवाशांना अँटो केल्यानंतर पुर्वी जे भाडे द्यावे लागत होते त्यात गेल्या कांही दिवसापासून पेट्रोल व डिझेलमुळे भाडेवाढ झालेली आहे.

                    *अडवणूक ?*

          हे जरी खरे असले तरी अनेक वेळा वयस्क प्रवासी, महीला तसेच प्रवाशांसोबत सामानांच्या बॅगा पाहून कांही अँटोवाले त्यांना आव्वाच्यासव्वा भाडे सांगत असल्याची अनेक प्रवाशांकडून तक्रार होताना दिसत आहे. अशाप्रकारे अडवून घेतलेले भाडे प्रवाशांना देणे भाग पडत असून त्यांना विनाकारण भूर्दंड होत आहे. 

        अशाप्रकारे ठराविक अंतरावर जाण्यासाठी अनेक प्रवाशांना वेगवेगळे भाडे अँटो चालकांकडून आकारण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे बागवाले यांनी स्पष्ट केले.

              *पोलिसांची दखल गरजेची !*

        बागवाले पूढे बोलताना म्हणाले की, या संदर्भात शहर पोलिस स्टेशन च्या ट्रॅफिक विभागाने यात पूढाकार घेऊन दखल घेणे आवश्यक असून अँटोचे ठरावीक अंतराचे भाडे निश्चित करुन त्या संदर्भातील *दरपत्रक प्रत्येक अँटोमध्ये लावण्याचे बंधन* चालकाला करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनमानी करुन, अडवणूक करुन प्रवाशांकडून भाडे वसूल करणारांवर अंकूश बसेल तसेच अँटोचालकांना परवडेल असे व नुकसान न होता प्रवाशांना योग्य भाडे दर लागेल. पोलिसांनी कायद्यानुसार हे तुर्त करणे गरजेचे असल्याचेही शेवटी मुन्ना बागवाले यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !