इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द*

प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग पोलिसांकडे जमा केली व ज्याची होती त्याला सुपुर्द करण्यात आली.एका हाॅटेल चालकाने हा प्रामाणिकपणा दाखवला.त्याबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार करुन कौतुक केले.

       प्रामाणिक माणसेही आजही आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण शनिवारी परळीत घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. विशाल हॉटेलचे संचालक दत्ता लहूदास मुंडे यांनी हा प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे. अंबाजोगाई येथील रहिवासी शेख सादेक हे परळीहून अंबाजोगाईला  रिक्षाने जात होते. आपली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस  ठेवली. अंबाजोगाई येथे पोचल्यानंतर रिक्षातून उतरत असतांना आपली बॅग नसल्याचं लक्षात आलं.  परळी ते अंबाजोगाई रोडवर कण्हेरवाडी येथील विशाल हॉटेलचे मालक दत्ता लहूदास मुंडे यांना हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर बॅग पडलेली आढळून आली. बॅग त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. बॅग मालकाचा शोध घेतला.बॅगमधील महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम 65 हजार रुपये शेख सादेक यांना परत देण्यात आली. हॉटेलमलकाच्या प्रमाणिकपणाबद्दल शहर पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, डीबीचे प्रमुख भास्कर केंद्रे, निर्मळ तात्या, शंकर बुडडे, तुकाराम मुरकुटे, सुंदर केंद्रे यांच्यासह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!