MB NEWS-नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे,बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता*

 *नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    सन २०१५ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगड येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद परळीत उमटले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.याप्रकरणी पोलिसांनी पदाधिकार्यांवर नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा आदी दोषारोप ठेउन गुन्हे दाखल केले होते.याप्रकरणात परळी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

           तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर श्रीक्षेत्र भगवान गड येथे 4 जानेवारी 2015 रोजी  दगडफेक झाली होती. याचे पडसाद म्हणून परळी येथील राष्ट्रवादीचे तात्कालीन नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तात्कालीन शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी तसेच नगरसेवक शकील कुरेशी,अझिझ कच्छी, पदाधिकारी अनंत इंगळे, शंकर कापसे,कादर कुरेशी,रवी मुळे, प्रितम जाधव,अमित केंद्रे,अमर रोडे,समीर कोरे, श्रीकांत माने, सुरेश नानावटे, बळीराम नागरगोजे आदि 15 जणांवर पोलिस प्रशासनाने भा.द.वि 143 व मुंबई पोलिस कायदा कलम 135 अन्वये गुन्हे दाखल केले. बेकायदेशीर जमाव करणे, नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, परळी बंद च्या घोषणा देणे आदी दोषारोप या प्रकरणी लावले होते. दोषारोप पत्र प्रथमवर्ग न्यायालय परळी वैजनाथ येथे दाखल झाले.या प्रकरणी सुनावणी होऊन साक्षी पुरावे तपासण्यात आले. या प्रकरणात परळी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.निलेश येलमाने यांनी सर्व 15 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड.प्रदीप गिराम यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार