MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य

 ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

     *दि.२ डिसेंबर २०२१*



मेष – कौटुंबिक वादविवाद मिटतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराची साथ लाभेल. मनासारख्या घटना घडतील.

वृषभ – शत्रू नामोहरम होतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल.


मिथुन – जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते.


कर्क – वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामांमध्ये अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा.


सिंह – आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल.


कन्या- आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मविश्‍वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.


तुळ – आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अतिथ्यामधे दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात. एकंदर लाभदायक दिवस.


वृश्‍चिक – कर्जदार तगादा लावतील. संभ्रमावस्था निर्माण होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक. स्वावलंबन आवश्यक आहे.


धनु – प्रेम प्रकरणांमध्ये यश. प्रवास घडतील. मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रामाणिकपणा व सचोटीने यशाकडे वाटचाल कराल.


मकर – प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभाग.लोकानुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.


कुंभ- नियमांचे पालन आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज. द्विधा मनःस्थिती.आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.


मीन – मनाविरुद्ध घटनांचा अनुभव येईल. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. जुने वादविवाद उफाळून येतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !