युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता..

 प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता


सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांच्या मार्फत श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्राध्यापक डाॅ. विठ्ठल रामकिशन भोसले यांना शारिरीक शिक्षण विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. 

सन 2012 मध्ये त्यांनी आपले एम. फिल. शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले व संशोधनाची खरी सुरुवात केली. 

सन 2013 मध्ये त्यांनी आपले शारिरीक शिक्षण या विषयात पी.एच.डी चे संशोधन कार्य  शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले.

 सन 8 मार्च 2016 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून त्यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ येथे स्पोर्ट्स ट्रेनर, रिसर्च असोसिएट यापदावर काम केले.

त्यानंतर अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांमधून शोधनिबंधाचे वाचन केले आहे. अनेक शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रकाशित झाले आहेत.

             आता संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्यासाठी नवे दालन खुले झाल्यामुळे  श्री पंडित गुरु पार्डीकर  महाविद्यालयचे अध्यक्ष माजी आमदार व्यंकटराव कदम, प्रो. डाॅ. सिंकुकुमार सिंग, प्राचार्य डाॅ. एच. पी. कदम, प्रो. डॉ. एम बी धोंडगे (अधीसभा सदस्य), प्रा.डॉ. ए. डि. टेकाळे (क्रिडा संचालक), डॉ. ए व्ही. कासांडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या