MB NEWS-अगोदर लस द्या मग नोंदणी करा - चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन

 अगोदर लस द्या मग नोंदणी करा - चंदुलाल बियाणी



आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन


औरंगाबाद (प्रतिनिधी-)

राज्यात कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सूरू आहे. आपल्यासह सर्व प्रशासन व इतरही समाजातील घटक लसीकरणासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र लसीकरणात नंबर एकवर पोहचला आहे. पण यात सध्या प्रचंड मोठा घोळ सूरू आहे. तो म्हणजे अनेक नागरिक फक्त नोंदणी करून लस न घेताच केंद्राबाहेर पडत आहेत. त्यामूळे हे त्यांच्यासाठी तर धोकादायक आहेच शिवाय इतरांसाठीही धोकादायक ठरणार आहे. तसेच हे लोक एकप्रकारे शासनाची फसवणूकही करत आहेत. त्यामुळे आरोग्य मित्र महाराष्ट्रची अशी मागणी आहे की, आगोदर लस देण्यात यावी, नंतरच नोंदणी करण्यात यावी. जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य मित्र महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. 

या निवेदनावर आरोग्य मित्र महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंजुताई दर्डा,  महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. पापालाल बोरा, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष डॉ.शिवकांत अणदूरे, विभागीय कोषाध्यक्ष राधेश्याम झंवर, मुंबई विभाग अध्यक्ष प्रशांत गोडसे, पुणे विभाग अध्यक्ष सोमनाथ लहाणे,  बीड जिल्हाध्यक्ष संतोषकुमार जेथलिया, लातूर जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज पाटणी, जालना जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, परभणी जिल्हाध्यक्ष मोहन धारासुरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार