MB NEWS- *पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती*

पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती

मुंबई ।दिनांक २५।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. भोपाळ येथे आज व उद्या होणाऱ्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्या पूर्णवेळ उपस्थित असणार आहेत. 


   मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची व विधिमंडळ सदस्यांची दोन दिवसीय बैठक भोपाळ येथे आजपासून होत आहे. मध्यप्रदेश भाजपच्या सह प्रभारी असल्याने या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे आज सकाळी विमानाने भोपाळ येथे दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर आगमन होताच  प्रदेश सरचिटणीस कविता पाटीदार, जिल्हाध्यक्ष सुमीत पचौरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यानंतर बैठकीसाठी प्रदेश कार्यालयाकडे त्या रवाना झाल्या. बैठकीत प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, सरचिटणीस भगवानदास सबनानी यांनी त्यांचे स्वागत केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !