युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे*

 *जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 

           मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. शहरातील श्रीनाथ हाँस्पिटल अरुणोदय मार्केट समोर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचे काँम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत शिबिराचा वेळ आहे.या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.यामध्ये,डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती यामध्ये दिली मिळणार आहे. तपासणी सर्व मोफत असून,कसलेही शुल्क लागणार नाही. या शिबिरामध्ये तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिकांनी शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.असे, आवाहन शिबिराचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या