MB NEWS-प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

 प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले



परळी वैजनाथ/प्रतिनिधी


महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू सेठ)यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले.



  नागापूर जिल्हा परिषद गटातील नागापूर,मांडेखेल , अस्वल आंबा तडोळी दौनापूर वानटाकळी ,मोहा, गडदेवाडी ,कावळेवाडी तसेच परिसरातील संतप्त शेतकरी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन केले आंदोलन करताच सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.



   परळी कार्यालयातील महावितरणचे उप अभियंता मा. आंबडकर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तोडलेले कृषी पंपाचे कनेक्शन पूर्ववत करणार अशी ग्वाही दिली.


   

  या आंदोलनास संबोधित करताना प्रदीप भैया मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत लोकनेते प्रा. टी.पी.मुंडे (सर)यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी दिले तसेच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी कालावधी घ्यावा विज बिल भरण्यासाठी शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याचा ऊस ,कापूस ,ज्वारी, सोयाबीन, अजूनही विकले नाही रब्बी हंगामातील पिकांना पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील व वर्षातून दोन वेळा कृषी पंपाची वीज खंडित करू नका असेही ते म्हणाले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.



   यावेळी परमेश्वर ढाकणे, भागवत सलगर, दामुअण्णा मुसळे ,सायस मुसळे, काशिनाथ मुंडे ,दिनकर नागरगोजे, माणिक बनसोडे, अँड. मनोज संकाये,राहुल कांदे, किशोर जाधव, बबलू सय्यद, हनुमंत राठोड ,मंगेश मुंडे, आनंत मुंडे, लक्ष्मण रुपनर ,हनुमंत रुपनर ,बाबुराव गडदे ,लक्ष्मण गडदे ,धनंजय कावळे ,आश्रुबा होनमने ,सहदेव सातभाई ,अशोक सटाले ,वैजनाथ सातभाई , सचिन सातभाई ,दौलत सातभाई, गोविंद सातभाई ,संतोष सातभाई, बंकटी ढाकणे, अनंत सलगर, धोंडीराम उबाळे, शरद सलगर, दत्तात्रय सोळंके, परमेश्वर सोनेराव ,शंकर माणिक मुसळे, बाळासाहेब मुसळे ,रविंद्र कावळे, राहुल कावळे, धुळूबा वाघमोडे, राम कावळे ,दिनेश गडदे ,शरद गायकवाड ,अशोक सटाले ,गणेश कराड, संभाजी भारती, नरहरी घुगे ,माणिक ढाकणे, शिवा बडे, ,महादेव दौंड, , शिवा चिखले, विनोद मानकर ,भास्कर गीते ,सचिन गीते, आदीसह भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार