इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*

 *जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे*



*यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*

        परळी वैजनाथ

परळी वैजनाथ येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन व मुबंईच्या अतिरेकी हल्यात शहीदाना श्रद्धांजली अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला.

26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले तर मुबंई येथील 26/11च्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रध्दांजली अर्पण करून शहीद दिन साजरा केला. या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे म्हणाले की समाजातील स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत या सर्वांना समान अधिकार देऊन सर्वसामान्य माणसाला सर्वच पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारे जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे आहे.

या वेळी यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अश्विनी मुंडे मॅडम, प्रा. एस.आर.कापसे, प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.डी.शेख,ए.डी.अघाव, व्ही.एन. शिंदे , डी.एन.फड, यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!