MB NEWS-एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....... आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे.

एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

     आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे. वैद्यनाथ मंदिर असो की अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थान यांना थेट मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र पाठवून खळबळ उडवून देणारा आणि ही उठाठेव प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून करणारा एक शिक्षक असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

           नांदेड येथील सिडको परिसरातील एक शिक्षक असणाऱ्या व्यक्तींने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास या गुरुजींनी सुरुवात केली.  कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रातनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा या गुरुजींनी लावला. ज्यात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी, किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर,अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. 

        दरम्यान या प्रकरणी हा प्राथमिक तपासात पुढे आलेला संदर्भ असुन पोलीस सखोल तपास करीत आहेत.या तपासातून मुळापर्यंत ची कहाणी काही दिवसांतच पुढे येण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !