MB NEWS- *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

 *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

परळी वै:दि 26 प्रतिनिधी

        परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त *संविधान जनजागृती अभियान* राबविले.


     या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनी विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून *संविधान जनजागृती* केली विद्यार्थ्यांच्या हातातील फलक व घोषणाबाजी लक्ष्यवेधी ठरली.यानंतर गावातील मुख्य जागेवर संविधानाबद्दल शाळेचे पर्यवेक्षक विनायक राजमाने यांनी परिपूर्ण माहिती दिली.या नंतर शाळेत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देहमुख, सुदाम शिंदे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र हरदास आदी मंचावरउपस्थित होते यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक मुरलीधर बोराडे यांनी संविधानाचे महत्व व गरज यावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.

संविधान सप्ताह राबविण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार