MB NEWS-सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर

 सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर

परळी (प्रतिनिधी) सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्था महाराष्ट्र राज्यची त्रैमासिक तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेत संस्थेच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी येथील पत्रकार संजय क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.

        सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय राजाभाऊ संगमनेरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सोलापूरचे गुरूदत्त प्रभू चव्हाण यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कोकण विभागीय उपाध्यक्षपदी चिपळूणचे संदीप मनोरकर यांची तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी परळी येथील पत्रकार तथा किसान ट्रॅक्टर स्पेअर चे संचालक संजय क्षीरसागर यांची सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली. तसेच विशेष सभासद म्हणून अंबादास दिल्लीकर यांची नियुक्ती करण्यात आली.

        मोहनरावजी पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये लातूर येथील समाजाच्या जनगणना सूची चे अनावरण करण्यात आले. तसेच जात पडताळणी समितीची स्थापना करण्यात येऊन त्यासाठी 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. समाजाची शिखर संस्था तसेच स्थानिक संस्थांमधील मतभेद दूर करण्यासाठी एकीकरण समिती देखील स्थापन करण्यात आली. यावेळी घटस्फोट निवारण आणि वधु वर समितीलाही मंजुरी देण्यात आली. यावेळी समाजाच्या जनगणनेसाठी वेबसाईटचे अनावरण देखील करण्यात आले.

या सभेसाठी सरचिटणीस ऍड. इंद्रजित डोंगरे, खजिनदार कैलास गवळी, संघटन सचिव किशोर कामले उपस्थित होते.

                   दरम्यान चव्हाण, क्षिरसागर,मनोरकर आणि दिल्लीकर यांच्या निवडीचे संस्थेचे तज्ञ व सल्लागार श्री. मनिषजी मानेकर साहेब मुबंई,जेष्ट समाज बांधव आणि मार्गदर्शक मा. श्री. नारायनरावजी यंदे साहेब पुणे ,संस्थेचे लातूर प्रतिनिधी प्रशांतजी चव्हाण साहेब, नांदेड चे किशोरजी जवळकर साहेब, माणिकप्रभू पिंपळे साहेब, संजय घवाळकर साहेब, कोल्हापूर चे राहुलजी काळे साहेब विजयजी करजगार साहेब, पुणे चे गणेशजी आहेर साहेब, मुंबई चे संजयजी ओतूरकर साहेब, जळगाव चे किशोरजी इंगळे साहेब,आणि  अजयजी इंगळे साहेब यांच्या सह सोलापूर च्या महिला प्रतिनिधी स्मिता मिरजगावकर, पुणे च्या वृशाली सूर्यवंशी, व मंगला टाकसाळे यांनी स्वागत केले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार