MB NEWS-रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे निधन पत्रकार नागोराव कराड यांना मातृशोक

 रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे निधन

पत्रकार नागोराव कराड यांना मातृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील पत्रकार नागोराव (बाळासाहेब) कराड यांच्या मातोश्री श्रीमती रत्नमालाबाई सुदामराव कराड यांचे आज बुधवारी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते.

      इंजेगाव येथील श्रीमती रत्नमालाबाई कराड या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच आज बुधवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल इंजेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

      स्व. रत्नमालाबाई कराड यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कराड परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार