MB NEWS-कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे

 कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे

   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.

        🕳️अशी आहे ना.धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट.......


     श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री ना. श्री. दिलीप वळसे पाटील साहेब, डिजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे. 


कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !