MB NEWS-26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

 26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली

कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

परळी | प्रतिनिधी

मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल 22 जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.


कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी  रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.

आज शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.

सदरील शिबिरात रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील डॉ.अनुराधा डाके, शशिकांत पारखे, शेख, अफसर, यादव यांनी रक्तसंकलन केले.

*यांनी केले रक्तदान*

यश मणिरोडे, निलेश जाधव, विश्वास कांबळे, संभाजी काळे, शुभम सरवदे, अरविंद साळुंके, मुन्ना बागवाले, व्यंकटी काळकोपरे, विनायक गायकवाड, खदीर शेख, निरंजन गायकवाड, मनोज आलदे, शब्बीर काकर, शिवाजी केंद्रे, राम सिरसाट, उमेश शिरोळे, सूरज राऊत, कृष्णा शिंदे, राकेश जाधव, डॉ.दिनेश कुरमे, प्रथमेश भास्कर, संतोष काळे यांनी रक्तदान केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !