पोस्ट्स

MB NEWS:अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

इमेज
  अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन        अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.                अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा समाजासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पवार आज मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठा समाजाप्रति समर्पित आणि कायम अग्रेसर असणारे नेते होते. मराठा महासंघाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे शशिकांत पवार यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. कोकणातून कारने परत येत असताना संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख

MB NEWS:योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते- योगशिक्षिका सुमन पवार

इमेज
  योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते- योगशिक्षिका सुमन पवार  चाकुर ता.७ प्रतिनिधी     योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते असे मत योग शिक्षीका सुमन पवार यांनी व्यक्त केले. चाकुर येथे एक दिवसीय योग, ध्यान व प्राणायाम शिबीर घेताना त्या बोलत होत्या.       चाकुर येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय योग, प्राणायाम व  ध्यान शिबीर मंगळळारी (ता.७) सकाळी सात वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आले. पतंजली महिला समितीच्या तालुकाध्यक्षा  योग शिक्षीका व सामाजिक कार्यकर्त्या सुमन पवार व प्रा.डाॅ. भानुदास पवार यांनी घेतले. या शिबीरीत अतिरिक्त पोलीस अधिक्षक निकेतन कदम, पोलीस निरिक्षक मोहीते साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत योग शिबीर घेण्यात आले. या शिबीरात सुमारे १५० पोलीस कर्मचारी व कुटुंबीय सहभागी झाले होते. योग शिक्षीका सुमन पवार यांनी योग व प्राणायाम कसे करावे व त्याचे शरिर व मनावर होणारे परिणाम सांगीतले. त्यांनी वेगवेगळया योग प्रकाराची माहीती देउन कशा पध्दतीने करावे याचे प्रशिक्षण दिले. त्याच पध्दतीने प्राणायाम बाबत माहीती दिली. या

MB NEWS:रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना समाजभूषण पुरस्कार

इमेज
  रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना समाजभूषण पुरस्कार  परळी :  शहरातील सराफ बाजारपेठेतील सुप्रसिद्ध आणि प्रत्येक मित्रपरिवाराचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणारे, त्याचबरोबर प्रेम भक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे श्री.रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना सुवर्णकार समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  सराफ असोशिएशनचे अध्यक्ष राहुल टाक व सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश टाक यांनी या पुरस्काराची घोषणा केली. रमेश धारासुरकर यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  आज श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रमेश मुंडीक यांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येणार आहे.

MB NEWS: कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून : आरोपी पती स्वतः पोलिसांच्या ताब्यात

इमेज
  कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून : आरोपी पती स्वतः पोलिसांच्या ताब्यात केज.....तालुक्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीने स्वतःच्या पत्नीचा कुर्‍हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.          केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्ती नावाने ओळखल्या जाणार्या  वस्तीवर दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२० सौ. आरती भगवान थोरात वय (२७ वर्ष) हिचा  नवरा भगवान शाहूराव थोरात  याने कुऱ्हाडीचा वार गळ्यावर करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

MB NEWS: पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
 'सुदर्शन चॅनल का पत्रकार है ना' म्हणत पत्रकार अभिमन्यू फड यांना जीवे मारण्याची धमकी  पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केज,(प्रतिनिधी):-सुदर्शन न्युज चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू फड यांना केज बस  स्थानकात दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी घडले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत. याबाबत केज पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, पत्रकार अभिमन्यू फड हे औरंगाबाद- अंबाजोगाई या बस मध्ये प्रवास करीत असताना आरोपी डॉ. मोसिन शेख व अनोळखी काळ्या शर्टचा इसम याने दि 6 फेब्रुवारी 2023 रोजी केज बस स्थानकात दुपारी 4.30 वा. बसमध्ये ड्रायव्हर साईडच्या सीट मागे उभा असताना  पाठीमागे सरक असे म्हणत तु सुदर्शन न्युज का है तो कुछ भी करेगा क्या असे म्हणुन कॉलर धरुन खाली औढुन मारहाण केली. लाथाबुक्कयाने चापाटाने मारुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान झा

MB NEWS:पोलीसांची कारवाई: लाखाचा गुटखा पकडला

इमेज
  पोलीसांची कारवाई: लाखाचा गुटखा पकडला परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या हेतूने गुटखा व तत्सम बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी  पोलीसांनी धर्मापुरी येथे एकावर कारवाई केली आहे.या कारवाईत लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, धर्मापुरी ता. परळी वै.येथील आरोपी याच्यी राहते घरात विनापरवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे दष्टीने बंदी घातलेली असतांना गोवा गुटखा, नवरत्न पान मसाला, राजनिवास व आरएमडी गुटखामाल चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पकडण्यात आले.याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कलम 328,272,273 प्रमाने कायदेशिर फिर्याद पोलीस हवालदार गोविंद बडे यांनी दिल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईत मुददेमाल किंमती 1,21,003/-रूपयाचे मालासह हस्तगत करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि मुंडे हे करीत आहेत. 

MB NEWS:परळीत पकडला गांजा: आमली पदार्थ विक्रेती ताब्यात

इमेज
  परळीत पकडला गांजा: आमली पदार्थ विक्रेती ताब्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळीतील बरकत नगर भागातील एका घरातून एका आमली पदार्थ विक्रेतीसह 951 ग्रॅम वजनाचा गांजा पकडण्यात आला आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click : ● काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा. #mbnews #subscribe #like #share #comments                    बरकत नगर परळी वै. येथे दिनांक 06/02/2023 रोजी दुपारी 4 वा. वा. सुमारास  यातील आरोपी नामे शेख बीपाशा शेख शब्बीर वय 53 वर्षे रा.बरकतनगर परळी वै येथील राहते घरातील पत्र्याचे उत्तरेकडील रुम मध्ये लाकडी काॅटच्यावर प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग मध्ये एकूण 951 ग्रॅम वजनाचा गुंगीकारक आमली पदार्थ गांजा 9510 /- रुपये बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याने जागीच मिळुन आली म्हणुन गुरनं 26/ 2023 कलम 8(b), 20 गुंगीकरण औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम-1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एम. एस. ठाकुर हे करीत आहेत. 

MB NEWS:गोविंदराव फुलारी यांचे निधन;नागभूषण फुलारी यांना पितृशोक

इमेज
  गोविंदराव फुलारी यांचे निधन;नागभूषण फुलारी यांना पितृशोक परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)             लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर नागभूषण फुलारी यांच्या वडील गोविंदराव फुलारी (वय ९०) यांचे सोमवारी (दि.०६) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.             मदनुर (जिल्हा कामारेड्डी- तेलंगणा) येथील रहिवाशी गोविंदराव फुलारी -पाटील यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.गोविंदराव फुलारी धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असत.ते अत्यंत मनमिळाऊ होते. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मदनुर (तेलंगणा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावाई, सुना,नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील नागभूषण फुलारी यांचे ते वडील होत. 

MB NEWS:अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन दिरांकडून भावजईवर अत्याचार

इमेज
  अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन दिरांकडून भावजईवर अत्याचार  गेवराई.....       शहरातील तय्यब नगर भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केला असल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपीला गेवराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.          गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी आपले पती बाहेर गेल्यानंतर  दिर घरी जेवन करण्यासाठी आला त्याला मी जेवन दिले व किचनमध्ये निघून आले तसेच त्यांनी मला आवाज दिला व आपल्या जवळ बोलावले मी जवळ गेले असता त्यांने त्याकडील मोबाईलमध्ये मी अंघोळ करत असलेले फोटो व व्हिडीओ मला दावखवले व म्हणाला तु जर माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवले नाहीतर मी हे अश्लिल फोटो व व्हिडीओ फेसबूकवर अपलोड करून व्हॉयरल करील असे म्हणल्यानंतर मी हा सगळा प्रकार सासरे यांना सांगितला परंतु त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगून वेळ मारून नेली परंतू इतक्यावरच न थांबता असेच मला एकटीला पाहुण माझ्या दिराने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच त्यांच

MB NEWS:प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार

इमेज
  सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-प्रा.अतुल दुबे प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक, विविध मंदिरात महाआरती परळी/प्रतिनिधी परळी शहर आणि परिसरातील शिवसैनिकांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास शिवसेना प्रणित युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केला.दरम्यान आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांनी प्रा.दुबे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रभुवैद्यनाथ रुद्राभिषेक, विविध मंदिरात महाआरती व  उपजिल्हा रुग्णालय येथे अविरतपणे 30 कार्यक्रम त्यांचे सेवा वृत्त करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.  कार्यकर्त्यांच्या वतीने  त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व केक कापून सत्कार करण्यात आला.  युवा सेनेचे जिल्हा समन्वयक, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  तथा सा

MB NEWS:शिवाजी देशमुख यांचा सत्कार

इमेज
  शिवाजी देशमुख यांचा सत्कार  परळी वैजनाथ.....       अखिल भारतीय मराठा महासंघ च्या परळी  शहराध्यक्षपदी  शिवाजी आनंदराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.       काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथराव गायकवाड , ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे , परळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव कांबळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष जावेद भाई शेख , अनु. जाती  विभाग दीपक शिरसाट , अनु जाती विभाग उपाध्यक्ष काँग्रेस रवींद्र वाघमारे, सरचिटणीस नितीन कसबे, श्रीकांत वाघमारे, यांच्या वतीने  सत्कार करण्यात आला.

MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संत गुरु रविदास यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  संत गुरु रविदासांना सामाजिक भेदभाव अमान्य होता-वैजनाथ माने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संत गुरु रविदास यांची जयंती उत्साहात साजरी परळी,(प्रतिनिधी):- संत गुरु रविदासांनी समाजवादाची तुतारी फुंकली होती. संत गुरु रविदास स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या अनेक दोह्यातूनही त्यांनी ती मांडली आहे. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणाऱ्यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही. अशी शिकवण संत गुरु रविदास यांनी दिली असल्याचे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी संत गुरु रविदास यांच्या जयंती दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी केले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी अरुणोदय मार्केट येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात संत गुरु रविदास यांची 646 वी जयंती साजरी करण्य

MB NEWS: शैक्षणिक सहलीने विद्यार्थी आनंदले, पालकही झाले समाधानी

इमेज
  लेंडेवाडी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक स्थळांना भेटी शैक्षणिक सहलीने विद्यार्थी आनंदले, पालकही झाले समाधानी परळी वैजनाथ दि.           लेंडेवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सहलीमुळे विद्यार्थ्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर आश्रम शाळेने सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मेजवानी दिल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.          लेंडेवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. शाळेचे अध्यक्ष जिवनराव राठोड यांनी शुभेच्छा दिल्यानंतर सहल मार्गस्थ झाली. श्री क्षेत्र तुळजापूर, कोल्हापूर, पन्हाळगड किल्ला, श्री महालक्ष्मी, कन्हेरीमठ, शाहू पॅलेस, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. ऐतिहासिक घटना समजून घेऊन धार्मिक महत्त्वही समजून घेतले. यात ऐतिहासिक वास्तू, गड - किल्ले आदी स्थळे पाहता आल्याने विद्यार्थी आनंदी झालेले दिसत होते. यामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.    

MB NEWS:विजयवाडा- नगरसोल एक्सप्रेस मध्ये एका मोबाईल चोरास रंगेहात पकडले

इमेज
  विजयवाडा- नगरसोल एक्सप्रेस मध्ये एका मोबाईल चोरास रंगेहात पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... प्रवासी रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस बल व रेल्वे पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत विजयवाडा नगरसोल या एक्सप्रेस गाडीमध्ये घाटनांदुर रेल्वे स्थानक दरम्यान प्रवासात असताना गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका व्यक्तीस दोन मोबाईल सह रंगेहात पकडले आहे.            याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी  की, रेल्वे पोलीस ठाणे परळी वै. येथील प्रभारी अधिकारी श्री परमेश्वर सोगे व RPF निरीक्षक मीना, पोलीस हवालदार/ बाबासाहेब फड, हे स्टाफसह उदगीर ते परळी असे रात्रीचे अतिमहत्वाची गाडी असलेल्या विजयवाडा ते नगरसोल एक्सप्रेस गाडीमध्ये गस्त घालत असतांना दि. 04/02/2023 रोजी रेल्वे स्टेशन घाटनांदून दरम्यान एक संशयीत इसम रेल्वे डब्यात चालु गाडीत फीरत असतांना त्यास ताब्यात घेण्यात आले.अधिक विचारपुस करता त्याने त्याचे नाव प्रदिप शिवाजी शिंदे वय 30 वर्ष रा. वापटी ता. वसमत जि. हिंगोली असे सांगितल्याने संशयावरुन त्याची झडती घेता त्याच

MB NEWS:परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक प्रा.अतुल दुबे यांचे "अतुलनिय" कार्य परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलपणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व  प्रा.अतुल दुबे सर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. तसेच परळी शहराच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात "अतुलनिय" असणारे  प्रा.अतुल दुबे सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच

MB NEWS:पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात

इमेज
  नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची गरज -सपोनि.प्रदीप एकसिंगे पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात परळी (प्रतिनिधी) बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा झालेला विकास, गतीमान झालेले जग, अभ्यासाच्या बदलत्या पध्दती आणि दप्तराचे ओझे यामध्ये जुन्या आणि महत्वपूर्ण मुल्यांची रूजवन विद्यार्थ्यांमध्ये होणे ही काळाची गरज आहे. भारतीय समाजव्यवस्थेचे घटक, रचना आणि मुल्ये विद्यार्थ्यांना कळले पाहीजेत यासाठी नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिरसाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप एकसिंगे यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपरी बु. येथे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. याप्रसंगी उद्‌घाटनपर भाषणात बोलत होते. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पिंपरी बु. चे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. शुक्रवार, दि.३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भव्य कार्यक्रमाचे शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि विद्येची देवता माता सरस्वतीचे प्रतिमापुजन  करून करण्यात

MB NEWS:जागतिक कर्करोग दिना निमित्त औरंगाबादेत कर्करोग जनजागृती रॅली सह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  जागतिक कर्करोग दिना निमित्त औरंगाबादेत कर्करोग जनजागृती रॅली सह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद         परळी (संजय क्षिरसागर).....औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व औरंगाबाद जिल्हा टू व्हीलर मेकँनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी कर्करोग जनजागृती मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  सदर रॅलीने शासकीय कर्करोग रुग्णालय आमखास मैदान,भडकल गेट,बाबा पेट्रोल पम्प,सेवनहिल्स,टी व्ही सेंटर या मार्गे मार्गक्रम केला. सदरील रँलीस रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड व विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड,श्री चांदभाई सय्यद यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली .या रँली मध्ये रुग्णालयातील डॉक्टर्स,परिचारिका व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी डॉ.विजय कल्याणकर,डॉ.बालाजी शेवाळकर,डॉ.ऋषिकेश खाडिलकर,डॉ.अर्चना राठोड,डॉ.दीपक बोकणकर,डॉ.अदिती लिंगायत डॉ.दर्पण जक्कल, डॉ.जितेंद्र पटेल, डॉ.नाझनीन सिद्दिकी, डॉ.संजय राठोड, डॉ.पूजा तोतला, डॉ.अब्दुल राफे, डॉ.कैलास चिंतले, डॉ.ऋषिकेश पुसे डॉ.विकास राठोड,श्री.रमेश ताठे,श्रीमती श्रद्धा देशमुख,श्री समीर काळूसे,श्

MB NEWS:संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित परळीत भव्य शोभायात्रा व किर्तनाचे आयोजन

इमेज
  संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित परळीत  भव्य शोभायात्रा व किर्तनाचे आयोजन  यासर्व कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा-शांतीनाथ शिंदे,राहुल गायकवाड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरू रविदास मंदिर  परळी व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने 5 फेब्रुवारी रोजी  संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित्त  परळी शहरात भव्य शोभायात्रा,किर्तन व महाप्रसादचे आयोजन केले असुन या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शांतीनाथ शिंदे उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी केले आहे. रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून  भव्य मिरवणूक निघणार असून ती डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महर्षी वाल्मिकी चौक यांच्या पुतळायांना अभिवादन करून एक मिनार चौक मोंढा मार्केट राणी लक्ष्मीबाई टावर मार्गे मार्गस्थ होऊन गुरू रविदास मंदिर येथे या शोभा याञेचा समारोप होणार आहे.तसेच कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम 2 ते 5 यावेळेत होणार आहे.   तरी सर्व सम

MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

इमेज
  बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या  वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप  परळी वै:-                 धडाडीचे युवक नेतृत्व खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे खा.गजानन कीर्तिकर सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मिठाई देऊन डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अभिनव विद्यालय संस्था सचिव साहेबराव फड,टीव्ही 9 मराठी चे प्रतिनिधी संभाजी मुंडे, परळी विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.   विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनव विद्यालय संस्था सचिव साहेबराव फड यांनी मार्गदर्शन करतांना पुढें म्हणाले की,बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिव सैनिकांकडून शहरात सातत्याने विविध सामाजिक बांधिलकी जोपासनारे उपक्रम राबविले जातात अशाच सामाजिक उपक्रमांचा सर्वांनी बोध घ्यावा

MB NEWS:पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई टेम्पो सह 51 लाखाचा गुटखा पकडला

इमेज
  पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई टेम्पो सह 51 लाखाचा गुटखा पकडला बीड, प्रतिनिधी.....       सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटक्याच्या विरुद्ध मोठी कारवाई केली असून एका टेम्पोत भरून जात असलेला गुटखा चौसाळा बीड रस्त्यावर पकडला आहे. टेम्पो सह ही 51 लाख रुपयांची कारवाई या पथकाने केली आहे यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे.      सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत  यांना गुप्त बातमीदाराकडून  माहिती मिळाली की, दिनांक 04/02   2023 रोजी पहाटे ट्रक क्रमांक जीजे 12 ए वाय 94 25 यामध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती  त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक 04/02/2023 रोजी 6:10वाजता चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव वजीर इम्रान गुल मोहम्मद वव किलन्नर समीर सुलेमान

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचा समारोप

इमेज
  पांगरी गाव आदर्श ग्राम करण्यासाठी प्रयत्नशील-सरपंच सुशील वाल्मिकराव कराड राष्ट्रीय सेवा योजना युवती विशेष शिबीरा सारख्या चांगल्या कार्यक्रमासाठी पत्रकारांनी प्रसिध्दी दिल्यास विद्यार्थ्यांना व महाविद्यालयास प्रोत्साहन मिळते -संजय देशमुख विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तसेच जाणिव असणे गरजेचे ती राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून निर्माण होते-प्रा.रविंद्र जोशी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचा समारोप परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)           आधुनिक काळात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तसेच सामाजिक जाणिव असणे गरजेचे ती राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून निर्माण होत असल्याचे प्रतिपादन प्रा. रवींद्र जोशी यांनी केले. ते लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या पांगरी येथे आयोजित सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.                      येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास वि

MB NEWS:निकोप आरोग्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरावी - दत्ताप्पा ईटके गुरूजी

इमेज
  निकोप आरोग्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरावी -  दत्ताप्पा ईटके गुरूजी परळी -वै: - वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर  आणि  प्राथमिक , माध्यमिक आश्रमशाळा व सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  आठ दिवशीय शिबिर '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' ही संकल्पन नुकताच समारोप झाला आणि वार्षिक स्नेह संमेलना कार्यक्रम संपन्न . वार्षिक स्नेह संमेलनच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहर एज्युकेशन सोसायटी चे सचिव मा . श्री .दत्ताप्पा ईटके  गुरूजी यांच्या हस्ते झाले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाईक सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा . श्री . संजय राठोड होते, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम, प्राचार्य अरूण पवार, मा . श्री . डि . एस . राठोड, सरपंच शाहुताई विजय राठोड, प्रा . डॉ . माधव रोडे, नागरगोजे सर, विजय राठोड, प्रा . डॉ . रमेश राठोड , प्रा . डॉ . भिमानंद गजभारे  , उपसरपंच कोंडिबा जाधव, राम राठोड सर अदि होते .  याउद्घाटन प्रसंगी ज . ए. सो . सचिव श्री . दत्ताप्पा ईटके म्हणाले, भारत हा युवका

MB NEWS:गाईच्या गोडजेवणातून माणुसकीचे दर्शन

इमेज
  गाईच्या गोडजेवणातून माणुसकीचे दर्शन ■ गोमातेच्या संगोपणातून चैतन्याची प्राप्ती होते - ह.भ.प चाटे महाराज परळी वै ( प्रतिनिधी ) दि.३ फेब्रुवारी २०२३ भारतीय संस्कृतीत गोमातेचे विशेष महत्व आहे. सर्व पौराणिक शास्त्र परंपरेत  गोमातेचे महत्व विशद केले आहे. गोमतेच्या पूजनातून आत्मानंदाची प्राप्ती होते तर गोमतेच्या संगोपणातून, सहवासातून चैतन्याची प्राप्ती होते तसेच जीवन अनेक रोगांपासून मुक्त होत असल्याचे प्रतिपादन खापरटोन येथे आयोजित गाईच्या गोडजेवनाच्या कार्यक्रमात बोलताना ह.भ.प.तुकाराम महाराज चाटे यांनी केले. आधुनिक उपयुक्ततावादी काळात प्राण्यांकडे केवळ उपयोगी दृष्टीने पाहण्याची वृत्ती वाढत आहे. केलेल्या उपकाराची जाण ठेऊन त्या ऋणातून उतराई होण्याची कृती मात्र कुठं पाहायला मिळत नाही. जिथे आई वडीलांबद्दलसुद्धा कृतज्ञता न ठेवता त्यांचं गोडजेवनही न करणारे अनेक लोक समाजात पाहायला मिळतात. परंतु मुक्या प्राणी मात्रांची, विशेषतः गोमतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिढ्यान्पिढ्यांपासून शेती व्यवसायात रूढ असलेले खापरटोन येथील शेतकरी श्री.हनुमंत श्रीरंग चाटे यांनी गोमतेच्या निधनानंतर गोडजेवणाच्या कार

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण

इमेज
परळीत अयोध्यानगरात लेकीच्या हस्ते कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापणा  पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण भव्य आणि सुसज्ज सभागृहाचे बांधकाम करण्याचा दिला शब्द परळी वैजनाथ ।दिनांक ०३। मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामाचा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि वाजत-गाजत मिरवणूक काढून अयोध्यानगरातील रहिवाशांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज लोक वर्गणीतून उभारलेल्या श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण केले. लेकीच्या हाताने मंदिरावर कळस बसविण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा रहिवाशांनी यानिमित्ताने पूर्ण केली. दरम्यान, मंदिरासाठी भव्य आणि सुसज्ज सभागृह बांधून देण्याचा शब्द पंकजाताईंनी यावेळी भाविकांना दिला.    जलालपूर परिसरातील अयोध्यानगरात रहिवाशांनी लोकवर्गणीतून श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिराचा कलशारोहण सोहळा आज पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात आणि थाटात पार पडला. सकाळी पंकजाताईंचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर नागरिकांनी मंदिराचा कळस त्यांच्याकडे सुपूर्द केला, त्यांनी तो कळस डोक्यावर घेऊन त्याची  वाजत-गाजत मिरवणूक काढली

MB NEWS:क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, पीटी उषा यांचीही भेट ; ड्रॅगन बोट खेळाडूंची मागणी केली सादर

इमेज
  खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, पीटी उषा यांचीही भेट ; ड्रॅगन बोट खेळाडूंची मागणी केली सादर दिल्ली । दि. ०२ ।  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी संसदेत सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांनी खा.प्रितमताई मुंडे यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा ही दिला.राजनाथ सिंह यांच्या भेटीने आपल्याला नवी ऊर्जा आणि चैतन्य मिळाले असल्याची भावना खा.मुंडे यांनी व्यक्त केली. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा यांचीही त्यांनी भेट घेतली. देशातील ड्रॅगन बोट खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाची संधी मिळावी याकरिता ड्रॅगन बोट खेळाला भारतीय ऑलम्पिक असोसिएशनने मान्यता द्यावी अशी मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्याकडे केली.