MB NEWS: पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

 'सुदर्शन चॅनल का पत्रकार है ना' म्हणत पत्रकार अभिमन्यू फड यांना जीवे मारण्याची धमकी




 पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल


केज,(प्रतिनिधी):-सुदर्शन न्युज चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू फड यांना केज बस  स्थानकात दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी घडले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.


याबाबत केज पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, पत्रकार अभिमन्यू फड हे औरंगाबाद- अंबाजोगाई या बस मध्ये प्रवास करीत असताना आरोपी डॉ. मोसिन शेख व अनोळखी काळ्या शर्टचा इसम याने दि 6 फेब्रुवारी 2023 रोजी केज बस स्थानकात दुपारी 4.30 वा. बसमध्ये ड्रायव्हर साईडच्या सीट मागे उभा असताना  पाठीमागे सरक असे म्हणत तु सुदर्शन न्युज का है तो कुछ भी करेगा क्या असे म्हणुन कॉलर धरुन खाली औढुन मारहाण केली. लाथाबुक्कयाने चापाटाने मारुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान झालेल्या झटापटीत हातातील घड्याळ तुटले आहे. तसेच खिशातील 14 हजार पाचशे रुपये पडले आहेत. या प्रकरणी पत्रकार अभिमन्यू फड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सदरील दोन आरोपी विरुद्ध गु.र.नं. 70/2023 कलम 323, 504, 506, 427, 34 भादवी सह कलम 4 महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणी प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य) मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतीबंधक अधीनीयम 2017 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !