MB NEWS:रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना समाजभूषण पुरस्कार

 रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना समाजभूषण पुरस्कार 




परळी :  शहरातील सराफ बाजारपेठेतील सुप्रसिद्ध आणि प्रत्येक मित्रपरिवाराचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणारे, त्याचबरोबर प्रेम भक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे श्री.रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना सुवर्णकार समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  सराफ असोशिएशनचे अध्यक्ष राहुल टाक व सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश टाक यांनी या पुरस्काराची घोषणा केली. रमेश धारासुरकर यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

आज श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रमेश मुंडीक यांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !