इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:परळीत पकडला गांजा: आमली पदार्थ विक्रेती ताब्यात

 परळीत पकडला गांजा: आमली पदार्थ विक्रेती ताब्यात



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
      परळीतील बरकत नगर भागातील एका घरातून एका आमली पदार्थ विक्रेतीसह 951 ग्रॅम वजनाचा गांजा पकडण्यात आला आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



      बरकत नगर परळी वै. येथे दिनांक 06/02/2023 रोजी दुपारी 4 वा. वा. सुमारास  यातील आरोपी नामे शेख बीपाशा शेख शब्बीर वय 53 वर्षे रा.बरकतनगर परळी वै येथील राहते घरातील पत्र्याचे उत्तरेकडील रुम मध्ये लाकडी काॅटच्यावर प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग मध्ये एकूण 951 ग्रॅम वजनाचा गुंगीकारक आमली पदार्थ गांजा 9510 /- रुपये बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याने जागीच मिळुन आली म्हणुन गुरनं 26/ 2023 कलम 8(b), 20 गुंगीकरण औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम-1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एम. एस. ठाकुर हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या