MB NEWS:पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात

 नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची गरज -सपोनि.प्रदीप एकसिंगे

पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात

परळी (प्रतिनिधी)

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा झालेला विकास, गतीमान झालेले जग, अभ्यासाच्या बदलत्या पध्दती आणि दप्तराचे ओझे यामध्ये जुन्या आणि महत्वपूर्ण मुल्यांची रूजवन विद्यार्थ्यांमध्ये होणे ही काळाची गरज आहे. भारतीय समाजव्यवस्थेचे घटक, रचना आणि मुल्ये विद्यार्थ्यांना कळले पाहीजेत यासाठी नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिरसाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप एकसिंगे यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपरी बु. येथे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. याप्रसंगी उद्‌घाटनपर भाषणात बोलत होते.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पिंपरी बु. चे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. शुक्रवार, दि.३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भव्य कार्यक्रमाचे शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि विद्येची देवता माता सरस्वतीचे प्रतिमापुजन  करून करण्यात आले. यावेळी उद्‌घाटक म्हणून उपस्थित असलेले सहा.पोनि.प्रदीप एकशिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जुन्या आणि नव्या काळातील शिक्षण पध्दती, शिक्षणाची बदलती अवस्था याबद्दल बोलतांना त्यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर प्रकाश टाकला. शिक्षणाच्या मुबलक सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत असतांना ग्रामिण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत. त्यांच्यातील कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्यास प्रगतीची अनेक शिखरे ते सहज पार करू शकतात असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते उत्तम दादा माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, उपसरपंच गणेश आबा पौळ, शिक्षक नेते शाम आघाव, शालेय समितीचे माजी अध्यक्ष बबनराव पौळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद चोपडे, पत्रकार दत्तात्रय काळे. केंद्रप्रमुख शाम राठोड, आदर्श शिक्षक सौदागर कांदे, महात्मा फुले शिक्षक पतसंस्थेचे कोषाध्यक्ष पांडे सर, शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे, उपाध्यक्ष युवराज पौळ, रूस्तूम माने, बिबिशन जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

मुख्य उद्‌घाटन सोहळा पार पडल्यानंतर वार्षीत स्नेहसंमेलनातील मुख्य सांस्कृतीक कार्यक्रमांना सुरूवात झाली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी चित्रपट गितं तसेच भक्तीगितं आणि भावगितांचं सुरेख सादरीकरण केले. त्याचबरोबर लघुनाटीका, एकांकिका आणि शेरोशायरीने उपस्थितांची मनं जिंकली. तालुकास्तरीय बाल-धमाल स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळा डिजीटल करण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत नागरीक तसेच ग्रामस्थांनी जमेल त्या पध्दतीने स्वयंस्फूर्तीने आर्थिक सहाय्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक गायकवाड यांच्यासह शाळेचे सहशिक्षक चिंते, पठाण, देशमुख, किरण महाजन, ढवळे, श्रीमती दासूद, श्रीमती काळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !