MB NEWS: कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून : आरोपी पती स्वतः पोलिसांच्या ताब्यात

  कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून : आरोपी पती स्वतः पोलिसांच्या ताब्यात



केज.....तालुक्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीने स्वतःच्या पत्नीचा कुर्‍हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

         केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्ती नावाने ओळखल्या जाणार्या  वस्तीवर दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२० सौ. आरती भगवान थोरात वय (२७ वर्ष) हिचा  नवरा भगवान शाहूराव थोरात  याने कुऱ्हाडीचा वार गळ्यावर करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !