MB NEWS:पोलीसांची कारवाई: लाखाचा गुटखा पकडला

 पोलीसांची कारवाई: लाखाचा गुटखा पकडला



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या हेतूने गुटखा व तत्सम बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी  पोलीसांनी धर्मापुरी येथे एकावर कारवाई केली आहे.या कारवाईत लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, धर्मापुरी ता. परळी वै.येथील आरोपी याच्यी राहते घरात विनापरवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे दष्टीने बंदी घातलेली असतांना गोवा गुटखा, नवरत्न पान मसाला, राजनिवास व आरएमडी गुटखामाल चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पकडण्यात आले.याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कलम 328,272,273 प्रमाने कायदेशिर फिर्याद पोलीस हवालदार गोविंद बडे यांनी दिल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईत
मुददेमाल किंमती 1,21,003/-रूपयाचे मालासह हस्तगत करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि मुंडे हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !