परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:निकोप आरोग्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरावी - दत्ताप्पा ईटके गुरूजी

 निकोप आरोग्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरावी -  दत्ताप्पा ईटके गुरूजी


परळी -वै: - वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर  आणि  प्राथमिक , माध्यमिक आश्रमशाळा व सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  आठ दिवशीय शिबिर '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' ही संकल्पन नुकताच समारोप झाला आणि वार्षिक स्नेह संमेलना कार्यक्रम संपन्न . वार्षिक स्नेह संमेलनच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहर एज्युकेशन सोसायटी चे सचिव मा . श्री .दत्ताप्पा ईटके  गुरूजी यांच्या हस्ते झाले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाईक सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा . श्री . संजय राठोड होते, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम, प्राचार्य अरूण पवार, मा . श्री . डि . एस . राठोड, सरपंच शाहुताई विजय राठोड, प्रा . डॉ . माधव रोडे, नागरगोजे सर, विजय राठोड, प्रा . डॉ . रमेश राठोड , प्रा . डॉ . भिमानंद गजभारे  , उपसरपंच कोंडिबा जाधव, राम राठोड सर अदि होते . 

याउद्घाटन प्रसंगी ज . ए. सो . सचिव श्री . दत्ताप्पा ईटके म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे, भारताने जगाला पर्यावरण संतुलन व मानसिक संतुलनचे विचार वारसा दिला आहे . भारतातील युवक शक्ति विधायक कामासाठी वापरायची असेल तर ती शिक्षित, निरोगी असावी लागेल . पर्यावरण संवर्धन ही काळाजी गरज आहे . पर्यावरण वाचेल तर पुढील पिढी वाचेल . विकास करताना पर्यावरण संवर्धनाची तरूण पिढीला कास धरावी लागेल . जिणे करून दोन्ही आघाडीवर विकास होईल . अशा शिबिराच्या कार्यक्रमातून युवकानी पर्यावरण, आचरण , आकलन हा मंत्र आत्मसाथ करून निकोप आरोग्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरावी .

यावेळी प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम, प्राचार्य अरूण पवार यांनी आपले विचार माडले, तसेच याप्रसंगी प्रा . डॉ . माधव रोडे लिखित दोन प्रबोधन नाटके  बाल विवाह प्रतिबंध कायदा जनजागरण नाटक युवतीनी सादर केले ,तसेच अण्णासाहेबांचा उपोषण अन् ग्रामविकास नाटक युवकांनी सादर केले यात साक्षी गंगाधरे, सैजल मंत्री , आरती शिंदे, दिव्या भोयटे, गायत्री सदरे साक्षी बदने संध्या रोडे यांनी तर राम फड, शैलेश दौंड, विश्वजीत हाके विवेक आघाव अभि रोडे, सोमनाथ मुंडे, सिध्दोधन प्रधान, किरण साखरे, पायल शिंदे, सोनाली आचारे,  महिला जागृती राष्ट्रभक्ती प्रबोधन जागर गीतांचा  संस्कृती कार्यक्रम संपन्न झाले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा . दिलीप गायकवाड, प्रास्ताविक नागरगोजे यांनी केले . तर विशेष सहकार्य सहभाग  अर्पणा ओपळे,  प्रा . उमाकांत कुरे , प्रा . मारूती मोकळे, प्रा . दत्ता मुंडे, प्रा . सदानंद लोंखडे, स्वामी ओंककार सर,, केशव गीत्तेसर, संतोष पेद्देवाड, आविनाश जाधव, गणेश परळीकर, आण्णासाहेब राठोड, बाळासाहेब देशमुख, विजय सुंरनार , भारत जगताप अदि केले . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!