MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचा समारोप

 पांगरी गाव आदर्श ग्राम करण्यासाठी प्रयत्नशील-सरपंच सुशील वाल्मिकराव कराड

राष्ट्रीय सेवा योजना युवती विशेष शिबीरा सारख्या चांगल्या कार्यक्रमासाठी पत्रकारांनी प्रसिध्दी दिल्यास विद्यार्थ्यांना व महाविद्यालयास प्रोत्साहन मिळते -संजय देशमुख


विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तसेच जाणिव असणे गरजेचे ती राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून निर्माण होते-प्रा.रविंद्र जोशी

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचा समारोप


परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)

          आधुनिक काळात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तसेच सामाजिक जाणिव असणे गरजेचे ती राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून निर्माण होत असल्याचे प्रतिपादन प्रा. रवींद्र जोशी यांनी केले. ते लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या पांगरी येथे आयोजित सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

                     येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचा समारोप गुरुवारी (दि.०२) करण्यात आला. समारोप कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख, दै.पुढारीचे तालुका प्रतिनिधी प्रा रवींद्र जोशी, सरपंच सुशील वाल्मिकराव कराड, पत्रकार संभाजी मुंडे, श्री.राँय, महादेव गित्ते, श्रीराम लांडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकरसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर सात दिवस शिबीरात उपस्थित रासेयोच्या स्वयंसेवीका विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी पुढे बोलताना प्रा.जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी तीन घटक महत्त्वाचे आहेत. ज्ञानात्मक विकास, आकलन व कौशल्य हे घटक महत्त्वाचे आहेत. हे घटक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून मिळतात.असे प्रतिपादन प्रा. जोशी यांनी केले तर सरपंच सुशील कराड यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातील विद्यार्थ्यांनी आमच्या गावात राहून स्वच्छता, प्रबोधन, वृक्षारोपण आदी कार्य केली.याबाबत विद्यार्थी व काँलेजचे आभार याच शिकवणीतून पांगरी हे गाव आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असून गावकरी त्यास सहकार्य करत आहेत. एकमेव पांगरी गाव आहे की ज्या गावात ग्रामपंचायतीकडे अँब्युलंस आहे. अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. यावेळी प्राचार्य डॉ मुंडे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी तर आभार प्रा.कल्याणकर मँडम यांनी मानले. शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.प्रविण फुटके, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा डॉ शहाणे, प्रा.राजर्षी कल्याणकर,प्रा विशाल पौळ यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विभुते, गौरख वाघमारे, राजेश देशमुख, विनोद आचार्य, हेमलता दुधाट व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !