इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जागतिक कर्करोग दिना निमित्त औरंगाबादेत कर्करोग जनजागृती रॅली सह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

 जागतिक कर्करोग दिना निमित्त औरंगाबादेत कर्करोग जनजागृती रॅली सह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

       

परळी (संजय क्षिरसागर).....औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व औरंगाबाद जिल्हा टू व्हीलर मेकँनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी कर्करोग जनजागृती मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर रॅलीने शासकीय कर्करोग रुग्णालय आमखास मैदान,भडकल गेट,बाबा पेट्रोल पम्प,सेवनहिल्स,टी व्ही सेंटर या मार्गे मार्गक्रम केला. सदरील रँलीस रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड व विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड,श्री चांदभाई सय्यद यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली .या रँली मध्ये रुग्णालयातील डॉक्टर्स,परिचारिका व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी डॉ.विजय कल्याणकर,डॉ.बालाजी शेवाळकर,डॉ.ऋषिकेश खाडिलकर,डॉ.अर्चना राठोड,डॉ.दीपक बोकणकर,डॉ.अदिती लिंगायत डॉ.दर्पण जक्कल, डॉ.जितेंद्र पटेल, डॉ.नाझनीन सिद्दिकी, डॉ.संजय राठोड, डॉ.पूजा तोतला, डॉ.अब्दुल राफे, डॉ.कैलास चिंतले, डॉ.ऋषिकेश पुसे डॉ.विकास राठोड,श्री.रमेश ताठे,श्रीमती श्रद्धा देशमुख,श्री समीर काळूसे,श्री.दादासाहेब तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.


*प्रश्नोत्तर सत्र*

 औरंगाबाद जिल्हा टू व्हीलर मेकँनिक असोसिएशन सदस्य व कर्करोग रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक यांच्या करीता कर्करोग प्रबोधनपर प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी म्हणून न्यूरो सर्जन डॉ.जीवन राजपूत हे होते . या मध्ये कर्करोग तज्ञ मार्फत रुग्णाच्या प्रश्नाचे समाधान करण्यात आले.या प्रसंगी डॉ.विजय कल्याणकर, डॉ.बालाजी शेवाळकर,डॉ.ऋषिकेश खाडिलकर,डॉ.अर्चना राठोड डॉ.दीपक बोकणकर,डॉ.अदिती लिंगायत डॉ.दर्पण जक्कल, डॉ.जितेंद्र पटेल, डॉ.नाझनीन सिद्दिकी, डॉ.संजय राठोड, डॉ.पूजा तोतला, डॉ.अब्दुल राफे, डॉ.कैलास चिंतले, डॉ.ऋषिकेश पुसे डॉ.विकास राठोड,श्री.रमेश ताठे,श्रीमती श्रद्धा देशमुख,श्री समीर काळूसे,श्री.दादासाहेब तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.   

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  समाजसेवा अधीक्षक श्री.संदीप भडांगे, श्री.बालाजी देशमुख, श्री.इंदल जाधव,श्रीमती वैशाली भिवसने,डॉ.अजीज ह्शमी,श्री.रवी आपार,श्री.के. आर.बोकाशे, श्री.सतीष खरात,श्री.यशवंत नंद,बाळू निकाळजे,सिद्धार्थ जाधव  यांनी  अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली भिवसने यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!