MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

 बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या  वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप 


परळी वै:-

                धडाडीचे युवक नेतृत्व खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे खा.गजानन कीर्तिकर सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मिठाई देऊन डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अभिनव विद्यालय संस्था सचिव साहेबराव फड,टीव्ही 9 मराठी चे प्रतिनिधी संभाजी मुंडे, परळी विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

  विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनव विद्यालय संस्था सचिव साहेबराव फड यांनी मार्गदर्शन करतांना पुढें म्हणाले की,बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिव सैनिकांकडून शहरात सातत्याने विविध सामाजिक बांधिलकी जोपासनारे उपक्रम राबविले जातात अशाच सामाजिक उपक्रमांचा सर्वांनी बोध घ्यावा असे प्रतिपादन केले.

    याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे संजय कदम गावडे,दीपक जोशी, बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेचे उपशहर प्रमुख सागर बुंदूले,नवनाथ सरवदे,रमेश लोखंडे, गोविंद चिवडे,गणेश सारस्वत, वैजनाथ देशमुख,अभिनव विद्यालया मधील प्रताप मुंडे सर,एन एन व्हावळे सर,पांडे एन आर सर,दराडे आर आर सर,कांदे एस आर सर,पुरी एम एम सर,सविता जंगले मॅडम आदी सह ईतर शिक्षक वर्द उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार