युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, पीटी उषा यांचीही भेट ; ड्रॅगन बोट खेळाडूंची मागणी केली सादर

 खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट




क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, पीटी उषा यांचीही भेट ; ड्रॅगन बोट खेळाडूंची मागणी केली सादर



दिल्ली । दि. ०२ । 
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी संसदेत सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांनी खा.प्रितमताई मुंडे यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा ही दिला.राजनाथ सिंह यांच्या भेटीने आपल्याला नवी ऊर्जा आणि चैतन्य मिळाले असल्याची भावना खा.मुंडे यांनी व्यक्त केली.

तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा यांचीही त्यांनी भेट घेतली. देशातील ड्रॅगन बोट खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाची संधी मिळावी याकरिता ड्रॅगन बोट खेळाला भारतीय ऑलम्पिक असोसिएशनने मान्यता द्यावी अशी मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्याकडे केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या