MB NEWS:योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते- योगशिक्षिका सुमन पवार

 योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते- योगशिक्षिका सुमन पवार 



चाकुर ता.७ प्रतिनिधी

    योग व प्राणायामात सातत्य ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते असे मत योग शिक्षीका सुमन पवार यांनी व्यक्त केले. चाकुर येथे एक दिवसीय योग, ध्यान व प्राणायाम शिबीर घेताना त्या बोलत होत्या. 


     चाकुर येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय योग, प्राणायाम व  ध्यान शिबीर मंगळळारी (ता.७) सकाळी सात वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आले. पतंजली महिला समितीच्या तालुकाध्यक्षा  योग शिक्षीका व सामाजिक कार्यकर्त्या सुमन पवार व प्रा.डाॅ. भानुदास पवार यांनी घेतले. या शिबीरीत अतिरिक्त पोलीस अधिक्षक निकेतन कदम, पोलीस निरिक्षक मोहीते साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत योग शिबीर घेण्यात आले. या शिबीरात सुमारे १५० पोलीस कर्मचारी व कुटुंबीय सहभागी झाले होते. योग शिक्षीका सुमन पवार यांनी योग व प्राणायाम कसे करावे व त्याचे शरिर व मनावर होणारे परिणाम सांगीतले. त्यांनी वेगवेगळया योग प्रकाराची माहीती देउन कशा पध्दतीने करावे याचे प्रशिक्षण दिले. त्याच पध्दतीने प्राणायाम बाबत माहीती दिली. यावेळी बोलतांना त्यांनी योग व प्राणायाम नियमीत करणारांचा आरोग्यावरचा खर्च बंद होउन शरिर निरोगी राहुन मनावर ताबा राहतो. यावेळी प्रा.डाॅ.भानुदास पवार यांनी ध्यान धारणे बाबत माहीती दिली. योगा, प्राणायाम व ध्यान धारणा करणे धाकधकिच्या जिवनात अविभाज्य भाग करण्याचे आवाहन पोलीसांना केले. पोलीसांवर कामाचा कायम ताण रहात असतो. शरिरावरचा व मनावरचा ताण कमी करायचा असेल योग, प्राणायाम व ध्यान धारणा अंगीकारण्याचे आवाहन केले. सुमारे दोन तास चाललेल्या शिबीराचा सर्व पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांनी लाभ घेतला.

           ● Video ●



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?