MB NEWS:पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई टेम्पो सह 51 लाखाचा गुटखा पकडला

 पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई टेम्पो सह 51 लाखाचा गुटखा पकडला

बीड, प्रतिनिधी.....

      सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटक्याच्या विरुद्ध मोठी कारवाई केली असून एका टेम्पोत भरून जात असलेला गुटखा चौसाळा बीड रस्त्यावर पकडला आहे. टेम्पो सह ही 51 लाख रुपयांची कारवाई या पथकाने केली आहे यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे.

     सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत  यांना गुप्त बातमीदाराकडून  माहिती मिळाली की, दिनांक 04/02   2023 रोजी पहाटे ट्रक क्रमांक जीजे 12 ए वाय 94 25 यामध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती  त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक 04/02/2023 रोजी 6:10वाजता चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव वजीर इम्रान गुल मोहम्मद वव किलन्नर समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन   ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 40 मोठे बोध प्रत्येक बोधा मध्ये चार पोते असे एकूण 160 होते किमती 36 लाख रुपये ट्रक किंमत पंधरा लाख रुपये  दोन मोबाईल 20000 रु असा एकूण किमती 51 लाख वीस हजार रुपयाचा माल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार