युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित परळीत भव्य शोभायात्रा व किर्तनाचे आयोजन

 संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित परळीत  भव्य शोभायात्रा व किर्तनाचे आयोजन




 यासर्व कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा-शांतीनाथ शिंदे,राहुल गायकवाड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरू रविदास मंदिर  परळी व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने 5 फेब्रुवारी रोजी  संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या 646 व्या जयंती निमित्त  परळी शहरात भव्य शोभायात्रा,किर्तन व महाप्रसादचे आयोजन केले असुन या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शांतीनाथ शिंदे उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी केले आहे.


रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून  भव्य मिरवणूक निघणार असून ती डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महर्षी वाल्मिकी चौक यांच्या पुतळायांना अभिवादन करून एक मिनार चौक मोंढा मार्केट राणी लक्ष्मीबाई टावर मार्गे मार्गस्थ होऊन गुरू रविदास मंदिर येथे या शोभा याञेचा समारोप होणार आहे.तसेच कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम 2 ते 5 यावेळेत होणार आहे.

  तरी सर्व समाज बांधवांनी  श्री.संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान परळी सार्वजनिक  जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे व राहुल गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या