MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण

परळीत अयोध्यानगरात लेकीच्या हस्ते कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापणा 

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण




भव्य आणि सुसज्ज सभागृहाचे बांधकाम करण्याचा दिला शब्द


परळी वैजनाथ ।दिनांक ०३।

मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामाचा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि वाजत-गाजत मिरवणूक काढून अयोध्यानगरातील रहिवाशांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज लोक वर्गणीतून उभारलेल्या श्रीराम मंदिराचे थाटात कलशारोहण केले. लेकीच्या हाताने मंदिरावर कळस बसविण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा रहिवाशांनी यानिमित्ताने पूर्ण केली. दरम्यान, मंदिरासाठी भव्य आणि सुसज्ज सभागृह बांधून देण्याचा शब्द पंकजाताईंनी यावेळी भाविकांना दिला.


   जलालपूर परिसरातील अयोध्यानगरात रहिवाशांनी लोकवर्गणीतून श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिराचा कलशारोहण सोहळा आज पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात आणि थाटात पार पडला. सकाळी पंकजाताईंचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर नागरिकांनी मंदिराचा कळस त्यांच्याकडे सुपूर्द केला, त्यांनी तो कळस डोक्यावर घेऊन त्याची  वाजत-गाजत मिरवणूक काढली. जागोजागी  रांगोळ्या, गुढया उभारून भाविकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. श्रीरामाचा जयघोष करत महिला व पुरुष भाविक यात सहभागी झाले होते.


*थाटात कलशारोहण* 

--------

वेदमंत्रांच्या घोषात, विधिवत पूजन करून पंकजाताईंच्या हस्ते मंदिरावर कळस बसविण्यात आला. मंदिरात सुंदर व आकर्षक स्थापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण व देवी सीतेच्या मुर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. भाविकांच्या वतीने त्यांचा  यावेळी सन्मान करण्यात आला. 


*सभागृह बांधकामाचा शब्द*

-----------

मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्या मुर्त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. एक आदर्श पती, आदर्श पत्नी व आदर्श भाऊ कसे असावेत याचे ते प्रतिक आहेत. या तीन गोष्टी असतील तर समाजाचं पतन होणार नाही. देवी सीता हे स्त्रीच्या सन्मानाचं उदाहरण आहे.  स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचा सर्वनाश होतो हे रामायणानं शिकवलं, त्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान राखा असं पंकजाताईं यावेळी म्हणाल्या. हे मंदिर सर्वांना सकारात्मक उर्जा देईल. मंदिरासाठी सभागृह बांधून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.


  कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, रमेश कराड, श्रीराम मुंडे, सरपंच गोवर्धन कांदे, ज्ञानोबा मुंडे गुरूजी, प्रसाद कराड, मारोती ढाकणे, भगवान भांड, त्रिंबक गिते, माणिक कोरडे, बालासाहेब मुंडे, सोपान गिते आदींसह भाविक भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !